Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

Ukraine News : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी CBS Newsच्या मुलाखतीत त्यांच्या आवडत्या अमेरिकन चित्रपट आणि कलाकारांबद्दल सांगितले. रॉबर्ट डी नीरो, अल पॅसिनो आणि ‘द गॉडफादर’चा त्यांनी उल्लेख केला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 16, 2026 | 09:18 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • डी नीरो , अल पॅसिनो आणि गॉडफादर ची आवड
  • शॉन पेनचा ऑस्कर आणि खास आठवण
  • विजय मिळाल्यावर परत द्या
Ukraine News : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी CBS News ला दिलॆल्या विस्तृत मुलाखतीत युद्धसोबतच आपल्या चित्रपटांच्या आवडीबद्दलही सांगितले . अमेरिकन सिनेमातील काही आवडते कलाकार आणि चित्रपटांचा उल्लेख करताना त्यांनी रॉबर्ट डी नीरो , अल पॅसिनो आणि द गॉडफादरचा खास उल्लेख केला . मुलाखतीत त्यांनी अभिनेता शॉन पेन यांच्याकडून मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराचीही आठवण सांगितली .

डी नीरो , अल पॅसिनो आणि गॉडफादर ची आवड

झेलेन्स्की यांना अमेरिकन सिनेमातील दिग्गज कलाकारांचे काम आवडते . रॉबर्ट डी नीरो आणि अल पॅसिनो यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला . द गॉडफादर या गाजलेल्या चित्रपटाचाही त्यांच्या आवडत्या चित्रपटांमध्ये समावेश आहे . विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पुढील भागात रॉबर्ट डी नीरो यांनी तरुण व्हिटो कॉर्लिओनची भूमिका साकारली होती .

तर अल पॅसिनो यांनी मायकेल कॉर्लिओनची भूमिका केली होती . त्यामुळे झेलेन्स्की यांनी घेतलेल्या या नावांमुळे त्यांच्या सिनेमाच्या आवडीची झलक पाहायला मिळाली .

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

शॉन पेनचा ऑस्कर आणि खास आठवण

मुलाखती दरम्यान झेलेन्सकी यांनी शॉन पेन यांनी त्यांना दिलेला ऑस्कर पुरस्कार ही दाखवला . २०२२ ,मध्ये रशियाने युक्रेनवर पूर्ण आक्रमण केल्यानंतर पेन यांनी कीव्ह मध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतली होती . त्यावेळी त्यांनी आपला ऑस्कर पुरस्कार युक्रेनच्या राष्ट्राअध्यक्षांकडे सोपवला होता . पेन यांनी हा पुरस्कार युक्रेनच्या विजयावरील विश्वासाचे प्रतीक म्हणून दिल्याचे त्यावेळी सांगितले होते . झेलेन्स्की यांनी सुरवातीला हा पुरस्कार स्वीकारण्यास संकोच व्यक्त केला होता .

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

विजय मिळाल्यावर परत द्या

शॉन पेन यांनी मात्र पुरस्कार स्वीकारण्यास आग्रह धरला . युद्ध संपेपर्यंत हा ऑस्कर युक्रेनमध्ये राहू शकतो . असे त्यांनी सांगितले होते . जेव्हा तुम्ही जिंकाल , तेव्हा तुम्ही तो मला परत द्याल . अशा आशयाचे यांचे शब्द झेलेन्स्की यांना आठवले . युद्ध राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर चर्चा होत असताना मुलाखतीत झेलेन्स्कीच्या सिनेमाविषयीच्या या

आठवणींमुळे संभाषणाला वेगळाच रंग मिळाला . एका बाजूला युद्धाची गंभीर परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला हॉलिवूडची क्लासिक सिनेमांबद्दल त्यांची आवड , असा या मुलाखतीतला वेगळा पैलू समोर आला .

 

 

Web Title: Ukraine news zelenskyys godfather connection he likes de niro and al pacino even showed off sean penns oscar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Latest Marathi News
  • Marathi News
  • Russia Ukraine War
  • ukraine
  • vladimir zelensky
  • World news

संबंधित बातम्या

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
1

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
2

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!
3

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार
4

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.