फोटो सौजन्य सोशल मीडिया
सप्टेंबरच्या सुरवातीला न्यू जर्सीतील MetLife Stadium येथे झालेल्या कार्यक्रमात मॅकलमोरने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भूमिका मांडली होती . त्यानंतर त्याला एड शिरीनच्या अमेरिकन दौऱ्यातून पुढील कार्यक्रमांमधून वगळण्यात आले . दौऱ्याचे प्रमोटर आणि स्टेडियम व्यवस्थापनांशी संबंधित निर्णयामुळे मॅकलमोरला पुढील कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार नसल्याचे सांगण्यात आले .
मॅकलमोरने यावर नाराजी व्यक्त करत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बोलणे थांबवणार नसल्याचे म्हंटले . या प्रकरणामुळे कलाकारांना मंचावर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर व्यक्त होण्याच्या अधिकाराबाबतही चर्चा सुरु झाली आहे .
AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
मॅकलमोरला वगळल्यानंतर Finneas, Aaron Rowe, Lukas Graham आणि Beoga यांनी उर्वरित ‘Loop Tour’मधून माघार घेतली. त्यांच्या निर्णयामागे मॅकलमोरशी एकजूट आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनाशी संबंधित भूमिका असल्याचे त्यांच्या निवेदनांमधून समोर आले. Beoga आणि Aaron Rowe यांनी आयर्लंडच्या इतिहासाचा संदर्भ देत आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!
या वादावर एड शिरीनने स्पष्टीकरण दिले आहे . मॅकलमोरला दौऱ्यातून काढण्याचा निर्णय आपला नसून प्रमोटर्स आणि संबंधित स्टेडियम व्यवस्थापनाचा होता , असे शिरीनने सांगितले . मॅकलमोरला कायम ठेवून कार्यक्रम सूर ठेवण्याबाबत त्याने संबंधितांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्याने म्हंटले आहे .
शिरीनने आपल्या कॉन्सर्टमधे राजकीय वादापेक्षा संगीत आणि एकतेला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे . मात्र मॅकलमोरला वगळल्यानंतर त्याच्या दौऱ्यातील सर्व प्रमुख लोकांनी माघार घेतल्याने Loop Tour च्या उर्वरित कार्यक्रमांभोवती नवा प्रश्न निर्माण झाला आहे .






