Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukraine War : कीव्हजवळ दारूगोळा साठवणूक केंद्रावर भीषण हल्ला; मृतांचा आकडा 38 वर

Ukraine War : कीव्हजवळील मायला गावातील दारूगोळा साठवणूक केंद्रावर झालेल्या रशियन हल्ल्यानंतर झालेल्या साखळी स्फोटांत मृतांचा आकडा 38 वर पोहोचला आहे. 20 जण जखमी असून चार जण अद्याप बेपत्ता आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात न फुटलेली स्फोटके असल्याने तो धोकादायक घोषित करण्यात आला असून बचाव पथकांकडून साफसफाई व शोधमोहीम सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 30, 2026 | 04:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ३८ जणांचा मृत्यू चौघांचा शोध सुरु
  • परिसर दूषित न फुटलेली स्फोटके हटवण्याचे काम सुरु
  • लष्करी साठवणुकीवर गंभीर परिणाम
Ukraine War : युक्रेनची राजधानी कीव्हजवळील मायला गावातील दारुगोळा साठवणूक केंद्रावर झालेल्या रशियन हल्ल्यानंतर मृतांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे . या हल्ल्यानंतर केंद्रात ठेवलेल्या दारूगोळ्याचा स्फोट होऊन मोठी आग लागली .

परिसरात मोठ्या प्रमाणात न फुटलेली स्फोटके आणि धोकादायक अवशेष असल्याने बचाव आणि साफसफाईचे काम अत्यंत सावधपणे सुरु आहे . युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडीमार झेलेन्स्की यांनी या घटनेला गंभीर दुर्घटना ठरवत जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले आहेत .

३८ जणांचा मृत्यू चौघांचा शोध सुरु

कीव्हच्या पश्चिमेला असलेल्या मायला येथील लष्करी सुविधेवर शुक्रवारी रात्री हल्ला झाल्यानंतर दारूगोळ्याचा साठ्याचा स्फोट झाला . या स्फोटाच्या मालिकेत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत . याशिवाय आणखी चार जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश असल्याचे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे . या हल्ल्यामुळे आसपासच्या परिसरात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे . बचाव पथकांनी मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आणली असली तरी . घटनास्थळी धोका कायम आहे . त्यामुळे शोध आणि बचावकार्य सुरु ठेवण्यात आले आहे .

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

परिसर दूषित न फुटलेली स्फोटके हटवण्याचे काम सुरु

स्फोटांनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि अवशेष तसेच न फुटलेली युद्धसामग्री पसरली आहे . त्यामुळे हा भाग धोकादायक आणि दूषित घोषित करण्यात आला आहे . युक्रेनच्या आपत्कालीन सेवांचे पायरोटेक्निक पथक घटनास्थळी तैनात असून न फुटलेली स्फोटके शोधून निष्क्रिय करण्याचे काम सुरु आहे .

झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार साठवणूक केंद्रात तोफगोळे , माईन्स ड्रोन आणि इतर दारुगोळा ठेवण्यात आला होता . हल्ल्यानंतर झालेल्या साखळी स्फोटांमुळे आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले .

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

लष्करी साठवणुकीवर गंभीर परिणाम

या घटनेनंतर निवासी भागाजवळ दारुगोळा साठवण्यात आल्याबद्दल युक्रेनमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत . अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या परिस्थितीची चौकशी सुरु केली असून , दारुगोळा साठवणुकीचे नियम पाळले गेले होते का. याचा तपास केला जात आहे .

संयुक्त राष्ट्रांच्या युक्रेनमधील मानवाधिकार निरीक्षण पथकानेही या प्रकरणाची माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान , झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार मागील आठवड्यात रशियाने युक्रेनवर जवळपास २००० हल्लेखोर ड्रोन १६०० हुन अधिक हवाई बॉम्ब आणि ३१ क्षेपणास्त्रे डागली आहेत . त्यामुळे युक्रेन मधील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे .

Web Title: Ukraine war massive attack on ammunition depot near kyiv death toll rises to 38

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Russia and Ukraine war
  • Russia Ukraine War Update
  • Ukraine War

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.