
Ukrainian milatry officials issues warning of world war 3 to britain
युक्रेनच्या उच्च लष्करी अधिकाऱ्याने ब्रिटनाला इशारा दिला आहे की, रशिया तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. पण रशियापुढे ब्रिटन टिकू शकणार नाही, असेही खळबळनक या अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. अधिकाऱ्याने म्हटले आहे की, व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) ने ब्रिटनवर हल्ला केला तर त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागले. यामुळे उशी होण्यापूर्वीच ब्रिटनने युक्रेनकडून धडा घेतला पाहिजे असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विधान युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या माजी सल्लागार व्हिक्टर अँड्रुसोव्ह यांनी केले आहे. त्यांनी नाटो प्रमुख मार्क रुटो यांच्याकजे पाश्चात्य देांना युद्धाची तयारी करण्याचे आवाहनही केले आहेत.
द सन या वृत्तसंस्थेशी बोलताना व्हिक्टर अँड्रुस्योव्ह यांनी म्हटवे की, पुतिन यांनी गेल्या महिन्यात ज्या स्वरात घोषणा केली होती की, युक्रेनसोबत शांतता चर्चा अयशस्वी झाली तर ते युरोपसोबत युद्धासाठी तयार आहेत. यावकुन पाश्चात्य देशांना भीती आहे की, रशिया नाटो देशांवर हल्ला करु शकतो. यामुळे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी तिसऱ्या महायुद्धात बुडतील असे व्हिक्टर यांनी म्हटले आहे. व्हिक्टर यांनी ब्रिटनच्या सैन्याला कमकुवत आणि जुन्या तंत्रज्ञानावर अधारित म्हटले आहे. आधुनिक युद्धासाठी ब्रिटनला मोठ्या तयारीची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
व्हिक्टर यांचे हे विधान ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पार्श्वभूमीवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रिटन आणि इतर युरोपीय राष्ट्रांनी ट्रम्पच्या शांतता योजनेला नकार दिल आहे. ही योजना युक्रेनच्या सार्वभैमत्वाला धोका निर्माण करणार आहे, कारण यामध्ये सर्व अटी रशियाच्या हिताच्या आहेत असे युरोपीय देशांनी म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेन युद्ध गेल्या काही महिन्यांपासून तीव्र होत चालले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इतर युरोपीय देशांचे अधिकारी हे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु आतापर्यंतच्या अनेक शांतता चर्चा अयशस्वी ठरल्या आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय युक्रेनच्या उच्च लष्करी अधिकाऱ्याच्या विधनाने अधिकच खळबळ उडाली आहे.
Ans: युक्रेनच्या उच्च अधिकाऱ्याने म्हटले आहे की, रशिया कधीही युरोपवर हल्ला करु शकतो, जर शांतता चर्चा यशस्वी झाल्या नाहीत. आणि रशियापुढे ब्रिटन टिकणार नाही असेही अधिकाऱ्याने म्हटेल ाहे.
Ans: ब्रिटनच्या लष्कर कालबाह्य झाले असल्याचे म्हटले आहे.