ना घर का ना घाट का! तालिबानने पाकड्यांना दाखवली जागा; IED ब्लास्टमध्ये कॅप्टन अन् 6 सैनिकांना...
पाकिस्तानवर तालिबानचा भीषण हल्ला
आयईडीच्या मदतीने केला हल्ला
एक कॅप्टन आणि 6 सैनिक झाले ठार
Taliban Attack On Pakistan: पाकिस्तानच्या पख्तूनख्वा भागात पाकच्या सैनिकांवर मोठा हल्ला झाला आहे. हा हल्ला सुरक्षा दलांच्या ताफ्यावर झाला होता. हा हल्ला आयईडीच्या मदतीने करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. दरम्य या हल्ल्यात पाकिस्तानचा एक कॅप्टन आणि 6 सैनिक ठार झाले आहेत. हा हल्ला तालिबानने केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानी लष्कराचे मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने ठार झालेल्या सैनिकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हा हल्ला बुधवारी रात्री झाल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या सुलतानी भागात हा हल्ला झाला. सुरक्षा दलाचा ताफा जात असताना अज्ञात बंदूकधारी लोकांनी तूफान गोळीबार केला. तसेच आयईडीचा देखील स्फोट केला आहे.
पाकिस्तानने देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी 7 दहशतवाद्यांना ठार मारले. बलूचीस्तानमध्ये सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत 18 दहशतवाद्यांना ठार मारले. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर देखील याला चोख प्रत्युत्तर देताना दिसून येत आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला! संरक्षणमंत्र्यांची उघड धमकी
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चार दिवसांच्या इस्तंबूल शांतता चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी अफगाण तालिबानला उघडपणे धमकी दिली आहे. आसिफ यांनी कठोर शब्दांत इशारा दिला की, जर पाकिस्तानमध्ये कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर तालिबानचा पूर्णपणे नाश केला जाईल आणि त्यांना पुन्हा गुहांमध्ये लपण्यास भाग पाडले जाईल.
पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला!

इस्तंबूलमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शांतता चर्चेचे चार दिवस पार पडले, मात्र यात काहीही निष्पन्न झाले नाही. पाकिस्तानची मुख्य मागणी होती की, अफगाण तालिबानने पाकिस्तानमध्ये दहशत पसरवण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करावी. ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “पाकिस्तानने बंधू देशांच्या विनंतीवरून संवादाची संधी दिली, परंतु अफगाण अधिकाऱ्यांच्या विषारी विधानांवरून त्यांची दुभंगलेली आणि कपटी वृत्ती दिसून येते.”