
us considers deploying dark eagle hypersonic missile to middle east against iran tensions spike
US Dark Eagle hypersonic missile deployment 2026 : पश्चिम आशिया म्हणजेच मध्यपूर्व (Middle East) भागातील संघर्षाचे रक्तरंजित चक्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यात पडद्यामागे वेगवेगळ्या पातळीवर वाटाघाटी आणि शस्त्रसंधीचे प्रयत्न सुरू असले, तरी प्रत्यक्षात मात्र युद्धभूमीवरील तणाव दिवसेंदिवस अधिक स्फोटक बनत चालला आहे. याच दरम्यान संरक्षण क्षेत्रा हादरवून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने थेट इराणला लक्ष्य करण्यासाठी आपले सर्वात आधुनिक आणि सर्वात वेगवान हायपरसॉनिक क्षेपणास्त्र, ‘डार्क ईगल’ (Dark Eagle Hypersonic Missile), आखाती प्रदेशात तैनात करण्याची मागणी पेंटागॉनकडे केली आहे. जर अमेरिकन प्रशासनाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला, तर ही जागतिक लष्करी इतिहासातील अमेरिकेची पहिलीच सक्रिय हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तैनाती ठरेल.
गेल्या काही महिन्यांत इराणने आपली लष्करी रणनीती कमालीची बदलली आहे. इराणने देशाच्या अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि जमिनीखालील सुरक्षित बंकर्समध्ये आपले अनेक मोबाईल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपक (Mobile Ballistic Missile Launchers) हलवले आहेत. हे तळ सध्या मध्यपूर्वेत तैनात असलेल्या पारंपरिक अमेरिकन क्षेपणास्त्रांच्या आणि हायमार्क (HIMARS) मधून सोडल्या जाणाऱ्या ‘प्रिसिजन स्ट्राईक मिसाईल’च्या (PrSM) टप्प्याबाहेर आहेत. इराणच्या याच सुरक्षित तळांना भेदण्यासाठी आता अमेरिकेने आपला सर्वात मोठा पत्ता बाहेर काढला आहे. सुमारे २,८०० ते ३,५०० किलोमीटरचा अवाढव्य पल्ला गाठणारे ‘डार्क ईगल’ क्षेपणास्त्र इराणच्या अंतर्भागात घुसून थेट हल्ला करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. लेबनॉनमधील नाजूक परिस्थिती आणि आखातातील वाढती लष्करी सज्जता पाहता, अमेरिका आता कोणत्याही क्षणी इराणच्या कमांड सेंटर्सवर थेट हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे दिसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chenab Tunnel : ₹2,352 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! हिमालयात 8.7 किमीचा बोगदा खणून भारत बदलणार नद्यांचा प्रवाह, पाकिस्तान बॅकफूटवर
‘डार्क ईगल’ हे अमेरिकन लष्कराचे लांब पल्ल्याचे हायपरसॉनिक शस्त्र (LRHW – Long-Range Hypersonic Weapon) आहे. हे जमिनीवरून चालणाऱ्या एका फिरत्या ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर (TEL) ट्रकवरून डागले जाते. हे क्षेपणास्त्र ‘बूस्ट-ग्लाइड’ (Boost-Glide) तंत्रज्ञानावर काम करते. याचा अर्थ असा की, सुरुवातीला एक शक्तिशाली रॉकेट बूस्टर याला हवेत प्रचंड उंचीवर घेऊन जाते आणि त्यानंतर त्यातून एक हायपरसॉनिक अचूक मार्गक्रमण करणारे वाहन (Hypersonic Glide Body) वेगळे होते. हे वाहन पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करून लक्ष्याच्या दिशेने झेपावते. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या पाचपट म्हणजेच मॅक ५ पेक्षा जास्त आहे, तर काही तज्ज्ञांच्या मते याचा सर्वोच्च वेग तब्बल मॅक १७ ते मॅक २० (ताशी अंदाजे २४,००० किलोमीटर) पर्यंत पोहोचू शकतो.
Distance is no longer a limitation. DARK WING enables accurate long-range engagement through autonomous operation, resilient guidance, and mission-ready adaptability. A smarter approach to strike capability. pic.twitter.com/hbxNHb8TWB — EDGE (@_edgegroup) June 4, 2026
credit – social media and Twitter
पारंपरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर त्यांचा मार्ग (Trajectory) ठरलेला असतो, ज्यामुळे शत्रूच्या रडारला त्यांचा वेध घेणे सोपे जाते. परंतु, ‘डार्क ईगल’ या बाबतीत पूर्णपणे वेगळे आणि अत्यंत घातक आहे. हे क्षेपणास्त्र लक्ष्याच्या जवळ पोहोचत असताना हवेतच अत्यंत वेगाने आपली दिशा आणि मार्ग बदलू शकते. यामुळे जगातील कोणतीही अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली (Air Defense System) या क्षेपणास्त्राचा मागोवा घेऊ शकत नाही किंवा त्याला हवेत नष्ट करू शकत नाही. शत्रूच्या रडारला आणि कमांडर्सना काही समजण्याच्या आतच हे क्षेपणास्त्र अत्यंत सुरक्षित असलेले बंकर्स आणि लष्करी तळ क्षणात राख करून टाकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Nepal Relations: शेजारी प्रथम! नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल भारत दौऱ्यावर; ‘या’ मोठ्या करारांवर होणार शिक्कामोर्तब
जरी हे क्षेपणास्त्र अत्यंत प्रगत आणि अचूक मानले जात असले, तरी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या चाचणी संस्थांनुसार, अद्याप या शस्त्राची प्रत्यक्ष युद्धात चाचणी झालेली नाही. हे एक प्रायोगिक आणि अत्यंत महागडे शस्त्र आहे. परंतु, इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेचा पारंपरिक क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने संपत आल्यामुळे वॉशिंग्टनला ही हायपरसॉनिक क्षमता तातडीने कार्यान्वित करायची आहे. जर अमेरिकेने ‘डार्क ईगल’ आखातात उतरवले, तर इराण आणि त्याचे मित्र देश याला थेट युद्धाची चिथावणी मानतील. रशिया आणि चीन यांसारखे महासत्ता देशही या तैनातीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हा निर्णय जर प्रत्यक्षात आला, तर मध्यपूर्वेतील सत्तेचे संतुलन बिघडेल आणि जागतिक तेल बाजारात (Global Oil Market) कच्च्या तेलाच्या किमती भडकून पुन्हा एकदा जागतिक आर्थिक मंदीचे सावट निर्माण होऊ शकते.