Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?

US-Iran War: इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील २१ तासांची महावाटाघाटी बैठक दोन्ही देशांनी एकमेकांवर दोषारोप केल्याने अयशस्वी ठरली असून, त्यामुळे दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीचे संकटात रूपांतर झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2026 | 09:38 AM
us iran islamabad peace talks fail 21 hours meeting araghchi jd vance 2026

us iran islamabad peace talks fail 21 hours meeting araghchi jd vance 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • २१ तासांचा थरार निष्फळ
  • इराणचा खळबळजनक दावा
  • युद्ध अटळ?

US-Iran Peace Talks Islamabad 2026 : जागतिक राजकारणातील सर्वात मोठ्या शांतता प्रयत्नाला आज जबरदस्त खिळ बसली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे ९ आणि १० एप्रिल रोजी पार पडलेली अमेरिका-इराण ‘महावाटाघाटी’ (US-Israel Iran War) बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली आहे. सलग २१ तास चाललेल्या या मॅरेथॉन चर्चेत दोन्ही बाजू कराराच्या अगदी जवळ पोहोचल्या होत्या, असे मानले जात होते. मात्र, रविवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी जाहीर केलेल्या विधानांमुळे ही चर्चा केवळ अपयशीच ठरली नाही, तर यामुळे मध्य-पूर्वेत युद्धाची ठिणगी पुन्हा पेटली आहे.

नेमकं कुठे माशी शिंकली? अराघची यांनी उघड केले गुपित!

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ‘X’ वर आपली खंत व्यक्त करताना अमेरिकेवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. अराघची यांच्या मते, इराणने ४७ वर्षांत प्रथमच इतक्या उच्च स्तरावर अमेरिकेशी थेट संवाद साधला होता. “आम्ही चांगल्या हेतूने टेबलावर आलो होतो आणि करार पूर्ण होण्याच्या बेतात होता. मात्र, अंतिम टप्प्यात वॉशिंग्टनने आपली भूमिका अधिक कठोर केली आणि नवीन, अतिरिक्त मागण्या समोर ठेवल्या,” असा दावा त्यांनी केला आहे. अमेरिकेने शेवटच्या क्षणी आपले धोरण बदलल्यामुळे ही चर्चा फिसकटली, असे इराणचे ठाम मत आहे.

In intensive talks at highest level in 47 years, Iran engaged with U.S in good faith to end war. But when just inches away from “Islamabad MoU”, we encountered maximalism, shifting goalposts, and blockade. Zero lessons earned Good will begets good will.
Enmity begets enmity.
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) April 12, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Blockade: ‘US Centcom’ मैदानात! आज संध्याकाळी 7:30 पासून होर्मुझमध्ये टाळेबंदी; इराणी अहंकाराला अमेरीकन नौदलच देणार उत्तर

गालिबाफ यांचा अमेरिकेवर निशाणा: “विश्वास ठेवणे कठीण”

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ, ज्यांनी इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले, त्यांनीही अमेरिकेवर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, इराणची करार करण्याची इच्छा होती, परंतु अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांचा विश्वास जिंकण्यात वॉशिंग्टन अपयशी ठरले. “भूतकाळातील कडवट अनुभवांमुळे आम्हाला अमेरिकेवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे,” असे गालिबाफ यांनी म्हटले आहे. या चर्चेदरम्यान इराणी जनतेने आपल्या सरकारला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले.

Following 21 hours of intensive talks, Iranian Foreign Minister Abbas Araghchi announced the failure to reach an agreement to end the war, describing the U.S. stance as ‘maximalist demands’ and an attempt to shift negotiation terms at the last minute. pic.twitter.com/2kYoepyGI7 — Eye on Palestine (@EyeonPalestine) April 12, 2026

credit – social media and Twitter

जे.डी. व्हान्स यांची भूमिका: “करार न होणे हे इराणच्या हिताचे नाही”

दुसरीकडे, अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. व्हान्स यांच्या मते, चर्चा अनिर्णित राहण्याचे कारण इराणचा हेका आहे. त्यांनी इशारा दिला की, “शांतता करार न होणे हे इराणसाठी अधिक धोक्याचे आहे.” अमेरिकेने स्पष्ट केले की, प्रादेशिक सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दोन्ही देशांमधील मतभेद इतके खोल आहेत की, २१ तासांची चर्चाही ते मिटवण्यासाठी अपुरी पडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Diplomatic War: 4,596 वर्षांचा तुरुंगवास? तुर्कियेचा नेतान्याहूंना दणका; इस्रायलनेही ‘कागदी वाघ’ म्हणत केली एर्दोगानची गुपितं उघड

मध्य-पूर्वेत युद्धाचे ढग गडद

४० दिवसांच्या भीषण संघर्षानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीचा काळ आता संपत आला आहे. इस्लामाबाद चर्चा अपयशी ठरल्यामुळे ही शस्त्रसंधी पुढे वाढवली जाण्याची शक्यता आता मावळली आहे. यामुळे इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा मोठा लष्करी संघर्ष सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर हे युद्ध सुरू झाले, तर त्याचा परिणाम जागतिक तेल पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवर होईल, ज्यामुळे भारतासारख्या देशांचेही टेन्शन वाढणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्लामाबादमध्ये झालेली अमेरिका-इराण शांतता चर्चा का अपयशी ठरली?

    Ans: इराणच्या मते, अमेरिकेने शेवटच्या क्षणी अटी बदलल्या, तर अमेरिकेच्या मते, इराणने महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवली नाही, त्यामुळे २१ तासांची चर्चा निष्फळ ठरली.

  • Que: या चर्चेचे नेतृत्व कोणी केले?

    Ans: अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व जे.डी. व्हान्स यांनी केले, तर इराणचे नेतृत्व संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी केले.

  • Que: आता शस्त्रसंधीचे काय होणार?

    Ans: चर्चा फिस्कटल्यामुळे ट्रम्प यांनी जाहीर केलेली दोन आठवड्यांची शस्त्रसंधी आता संपुष्टात येण्याची आणि पुन्हा युद्ध सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Us iran islamabad peace talks fail 21 hours meeting araghchi jd vance 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Trump Warns China : चीनची खैर नाही! ट्रम्प यांचा ५०% टॅरिफ बॉम्बचा इशारा, इराणशी मैत्रीमुळे ड्रॅगन संकटात?
1

Trump Warns China : चीनची खैर नाही! ट्रम्प यांचा ५०% टॅरिफ बॉम्बचा इशारा, इराणशी मैत्रीमुळे ड्रॅगन संकटात?

Hormuz Blockade: ‘US Centcom’ मैदानात! आज संध्याकाळी 7:30 पासून होर्मुझमध्ये टाळेबंदी; इराणी अहंकाराला अमेरीकन नौदलच देणार उत्तर
2

Hormuz Blockade: ‘US Centcom’ मैदानात! आज संध्याकाळी 7:30 पासून होर्मुझमध्ये टाळेबंदी; इराणी अहंकाराला अमेरीकन नौदलच देणार उत्तर

होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे वाद आणखी चिघळला! युद्धविराम झाला असताना देखील तेलसंकट कायम
3

होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे वाद आणखी चिघळला! युद्धविराम झाला असताना देखील तेलसंकट कायम

US Iran Talks Fails : इकडे चर्चा फेल अन् तिकडे ५० गुप्तहेरांना अटक; इराणची अमेरिका-इस्रायलविरोधात मोठी कारवाई
4

US Iran Talks Fails : इकडे चर्चा फेल अन् तिकडे ५० गुप्तहेरांना अटक; इराणची अमेरिका-इस्रायलविरोधात मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.