Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी

US Iran Negotiations : अमेरिका-इराण वाटाघाटी चर्चा सकारात्मक दिशेने सुरु असून दोन्ही देशांत नुकतीच पार पडलेली चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेनुसार, इराणला लवकरच अमेरिकेने गोठवलेली संपती परत मिळणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 02:31 PM
US Iran Negotiations

US Iran Negotiations

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराणमध्ये पडद्यामागे मोठा करार?
  • ५७,००० हजार कोटींच्या निधीवर मोठा निर्णय
  • वाचा काय घडलं चर्चेत?
US Iran Negotiations News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमध्ये कतारची राजधानी दोहा येथे अप्रत्यक्ष चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांत ६० दिवसांच्या युद्धविरामाच्या अमंलबजावणीवरील चर्चा सकारात्मकपणे सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेत  अमेरिकेने इराणची जप्त केलेल्या मालमत्ता, होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक आणि दोन्ही देशांतील संवाद यंत्रणा या मुद्द्यावर वाटाघाटी सुरु आहे.

Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी

इराणला ५७ कोटींचा निधी परत मिळणार?

इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या चर्चेत इराणच्या ६ अब्ज डॉलरच्या म्हणजे ५७ हजार कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेबद्दल चर्चा झाली. ही मालमत्ता इराणला टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील  व्यापारी वाहतूकही सुरळित करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न केले.

भविष्यात कोणताही वाद झाल्यास तो संवादातून सोडवण्यासाठी स्वतंत्र संपर्क यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली असल्याचे गरीबाबादी यांनी सांगितले. पंरतु या चर्चेत इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत कोणतीही वाटाघाटी करण्यात आलेली नाही.

मध्यस्थीची भूमिका

सध्या अमेरिका-इराण चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थ म्हणून कार्य करत आहे. या देशांच्या प्रनिधींमार्फत स्वतंत्र चर्चा सुरु आहे. दोन्ही देश आपल्या अटी या देशांमार्फत एकमेकांपर्यंत पोहोचवत आहे. कतारने ही वाटाघाटी सकारात्मक झाली असल्याचे सांगितले असून पुढील चर्चा ०९ जुलै नंतर होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची भूमिका

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेंस यांनी चर्चा योग्य दिशेने सुरु असल्याचे म्हटले. पंरतु या कराराचे भवितव्य इराणवर अवलंबून असेल, हेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतील ताणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुढील चर्चेत इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा केली जाईल असे व्हेंस यांनी सांगितले.

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष्य दोन्ही देशांतील चर्चेकडे लागले आहे. दोन्ही देशांमधील चर्चा यशस्वी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच मध्यपूर्वेत स्थिरता येईल आणि होर्मुझचा मार्ग सुरळित झाल्यास इंधन आणि गॅस वाहतूक पुन्हा सुरळितपणे सुरु होईल. यामुळे पुढी वाटाघाटीत इराणच्या अणु कार्यक्रमावर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?

Web Title: Us iran negotiations 6 billion frozen assets release doha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.