Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Talks : ट्रम्प यांचा दावा हवेत? अमेरिकेसोबतच्या दोहा चर्चेला इराणचा स्पष्ट नकार; युद्ध अटळ?

US Iran Talks : अमेरिका-इराण चर्चेबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे. कतारमधील चर्चेच्या ट्रम्प यांच्या दाव्याला इराणने स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत अशी कोणतीही बैठक आयोजित नसल्याचे इराणने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 09:46 AM
Iran rejects doha talks

Iran rejects doha talks

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा कतारमधील चर्चेचा दावा फोल
  • इराणने दिला स्पष्ट नकार
  • युद्ध अटळ?
US Iran Talks News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील प्रस्तावित असलेल्या कतारमधील चर्चेबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारची राजधानी दोहा येथए दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची चर्चा होणार असल्याचा दावा केला होता. मात्र, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा पूर्णपणे  फेटाळून लावला आहे. अमेरिकेसोबत कोणतीही बैठक निश्चित नसल्याचे इराणने म्हटले आहे.

Russia-Ukraine War : पुन्हा युद्धाचा भडका उडणार? रशियाकडून युक्रेनवर ड्रोन हल्ला; 12 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

इराणचा अमेरिकेसबोत चर्चेस स्पष्ट नकार

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले आहे की, इराणचे शिष्टमंडळ या आठवड्यात कतारला जणार आहे. परंतु याचा अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतच्या कोणत्याही चर्चेशी संंबंध नाही. बघाई यांच्या या विधानामुळे ट्रम्प यांच्या दाव्यानंतर दोन्ही देशांतील शांतता चर्चेबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे.

६० दिवसांचा युद्धविरामाचे उल्लंघन

दोन्ही देशांत १८ जून रोजी ६० दिवसांचा युद्धविराम  लागू करण्यात आला होता. परंतु दोन्ही देशांनी एकमेंकावर हल्ले करत युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. सुरुवातील अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यात आले. यामुळे पुन्हा मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चर्चेचे संकेत, परंतु…

परंतु दोन दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी आणि संघर्ष रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा सुरु केल्याचे संकेत दिले. दोन्ही देशांनी होर्मुझमधून जहाजांच्या सुरक्षित वाहतूक आणि प्रादेशिक स्थिरतेवर चर्चा सुरु असल्याचे म्हटले. मात्र, इस्माईल बघाई यांनी कतारमधील चर्चेला नकार दिल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

इराणच्या काही कारवायानंचर अमेरिकेने इराणच्या काही ठिकाणांवर हल्ले केले होते. यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला होता. यामुळे अस्थिरता निर्माण झाली होती. परंतु दोन्ही देशांतील परिस्थिती नियंत्रित आणण्याकरिता १४ मुद्द्यांच्या सामंजस्य करारावर अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले होते. परंतु इराणने नकार दिल्याने दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

ट्रम्प यांचा इशारा

या कराराआधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी इराणने हल्ले थांबवले नाही, तर त्यांना जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्यात येईल. यासाठी कोणतीही कारवाई करायला अमेरिका सज्ज आहे असा इशारा त्यांनी दिला होता. तर अमेरिकेने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यास सर्व राजनैतिक चर्चा आणि इतर मार्ग बंद करु असे इराणने स्पष्ट केले होते.

US Iran Conflict : युद्धाचा धोका टळला? अमेरिका आणि इराण हल्ले थांबवण्यास तयार; कतारमध्ये ‘होर्मुझ’बाबत होणार महत्त्वाची बैठक

Web Title: Us iran talks iran rejects us doha talks claims donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.