Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: इस्रायली भूदलाचे चक्रव्यूह, 1,000 मरीन कमांडो; अमेरिकन अजगर चारी बाजूंनी आता ‘असे’ गिळणार इराणला

US-Iran War: मध्यपूर्वेतील युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याला दहा दिवस उलटले आहेत. अमेरिका इराणवर हवाई हल्ले सुरूच ठेवत आहे. व्हायरल झालेल्या नकाशानंतर, संभाव्य जमिनीवरील हल्ल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 18, 2026 | 05:29 PM
us iran war ground invasion plan leak graphic map centcom marines strait of hormuz airstrikes

us iran war ground invasion plan leak graphic map centcom marines strait of hormuz airstrikes

Follow Us
Follow Us:
  • जमिनीवरील हल्ल्याची गुप्त योजना उघड
  • आखाती देश आणि कुर्दिश लढवय्यांची साथ
  • पर्वतीय प्रदेश आणि इराणचे आव्हान

मध्य-पूर्व आशियातील युद्धाचा भडका आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील थेट युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याला १० दिवस उलटून गेले आहेत. अमेरिकन हवाई दलाने इराणवर आपला प्रचंड बॉम्बहल्ला सुरूच ठेवला असून, इराणचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले जात आहेत. मात्र, याच दरम्यान आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि सोशल मीडियावर एका ग्राफिक नकाशाने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. इस्रायली सोशल मीडिया अकाउंट्सवरून व्हायरल झालेल्या या नकाशात दावा करण्यात आला आहे की, अमेरिका आता केवळ हवेतून नाही, तर इराणवर थेट जमिनीवरून (Ground Invasion) हल्ला करण्याची एक अत्यंत गुप्त आणि मोठी रणनीती आखत आहे.

गेल्या १० दिवसांत अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणच्या पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागांतील एकाही प्रांताला सोडलेले नाही. इराणी लष्कर आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मुख्य तळ शोधून ते नष्ट केले जात आहेत. युद्धाच्या दहाव्या दिवशी अमेरिकेने थेट इराणी नौदलाचे मुख्य ठाणे असलेल्या बंदर अब्बास आणि क्यूशम बेटावर भीषण बॉम्बहल्ला केला. एवढेच नव्हे, तर गेल्या पाच महिन्यांत सुरक्षित राहिलेल्या दक्षिण इराणमधील फार्स प्रांत आणि मध्य इराणमधील यझद प्रांतावरही अमेरिकन क्षेपणास्त्रांचा पाऊस पडला आहे. इतका भीषण प्रांताप्रांतांवर मारा होऊनही इराण माघार घेण्यास तयार नाही. यामुळेच आता अमेरिकेने आपला सर्वात घातक ‘प्लॅन-बी’ म्हणजेच जमिनीवरील सैन्याची कारवाई सुरू करण्याची तयारी केल्याचे या नकाशावरून स्पष्ट होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: अघटित घडणार! इस्रायलमध्ये अमेरिकेच्या 60 हून अधिक युद्धनौका, विमानांचा खडा पहारा; रडारवर 3 मोठी अणू ठिकाणे

समुद्र आणि सीमांवरून चक्रव्यूह; आखाती देशांची मिळणार साथ?

व्हायरल झालेल्या ग्राफिक नकाशानुसार, अमेरिकन सैन्याने इराणला चारी बाजूंनी घेरण्याचे नियोजन केले आहे. अमेरिकन नौदल गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) म्हणजेच आखाती देशांच्या सैन्याला सोबत घेऊन इराणच्या खारग बेट, खुझेस्तान, बुशेहर, बंदर अब्बास आणि होर्मोझगान या किनारपट्टीच्या संपूर्ण प्रांतांवर एकाच वेळी हल्ला करू शकते. या युद्धादरम्यान इराणने अमेरिकेचे तळ असलेल्या सौदी अरेबिया, युएई, जॉर्डन, कतार, बहरीन, इराक आणि कुवेत या देशांवर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराणने या देशांमधील तेल शुद्धीकरण कारखाने, निवासी भाग आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे हे आखाती देश आता इराणविरुद्धच्या या जमिनीवरील मोहिमेत अमेरिकेला आपली जमीन आणि लष्करी रसद पुरवून मदत करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवरील संभाव्य जमिनीवरील हल्ल्याबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी “इतर देश हा जमिनीवरील हल्ला करतील,” असे सूचक वक्तव्य करून थेट उत्तर देणे टाळले होते. ट्रम्प यांच्या या विधानातील ‘इतर देश’ म्हणजे इराणच्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेले सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) हेच आखाती देश असण्याची शक्यता आता अधिक दृढ झाली आहे.

उत्तरेकडून कुर्दिश लढवय्ये आणि इस्रायलची चाल

या गुप्त नकाशात आणखी एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. इराकी सीमेवरून इराणमध्ये घुसखोरी करण्यासाठी अमेरिकेने इराकमध्ये सक्रिय असलेल्या कुर्दिश मिलिशिया (कुर्दिश लढवय्ये) यांना मोठ्या प्रमाणावर आधुनिक शस्त्रे आणि लष्करी उपकरणे पुरवली आहेत. नुकताच इराणने इराकमधील कुर्दिश लढवय्यांचा बालेकिल्ला असलेल्या सुलेमानिया प्रांतावर मोठा ड्रोन हल्ला केला होता, ज्यावरून हे स्पष्ट होते की इराणलाही या कुर्दिश लढवय्यांच्या बंडाची मोठी भीती आहे.

जेव्हा अमेरिका दक्षिण आणि समुद्राच्या बाजूने आक्रमण करेल, तेव्हा हे कुर्दिश लढवय्ये उत्तरेकडून थेट इराणमध्ये प्रवेश करून राजधानी तेहरानच्या दिशेने कूच करतील. या मोहिमेत सीमेवरील इराणी सैन्याचा मुकाबला करण्यासाठी कुर्दिश लढवय्यांना इस्रायली भूदलाचे (Israeli Ground Forces) थेट पाठबळ दिले जाणार असल्याचेही नकाशामध्ये दाखवण्यात आले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला लागून असलेल्या इराणच्या बलुचिस्तान आणि सिस्तान प्रांतातही जमिनीवरील हल्ले होण्याची दाट शक्यता आहे, जिथे इराणी राजवटीवर नाराज असलेले बलुच फुटीरतावादी गट अंतर्गत बंड पुकारू शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Protests : ‘रॅपर ते सत्तेचे शिखर’, पण आता बलेंद्र शहांची खुर्ची धोक्यात; एका आत्मदहनाने बदलले ‘असे’ बदलले नेपाळचे सत्ताकारण

अमेरिकेच्या नौदलाची महाकाय युद्धतयारी

जमिनीवरील हल्ल्याची ही भीती केवळ एका नकाशापुरती मर्यादित नसून, प्रत्यक्ष युद्धभूमीवरही तशा हालचाली दिसत आहेत. अमेरिकेच्या सेंटकॉमने ओमानच्या आखातात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या वेशीवर दोन महाकाय विमानवाहू जहाजे (Aircraft Carriers) तैनात केली आहेत. ही जहाजे डझनभर एफ-१८ सुपर हॉर्नेट लढाऊ विमाने, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्स आणि अत्याधुनिक टेहळणी विमानांनी सज्ज आहेत.

या ताफ्यात १९ ते २० विनाशकारी युद्धनौकांचा समावेश असून, यामध्ये किनारपट्टीच्या अगदी जवळ जाण्याची क्षमता असलेल्या विशेष उभयचर युद्धनौका (Amphibious Assault Ships) आहेत. या नौका अवघ्या काही तासांत इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर शेकडो रणगाडे, पायदळ लढाऊ वाहने (ICVs) आणि लष्करी वाहने उतरवू शकतात. याशिवाय, खारग आणि केशम बेटांवर अचानक कब्जा मिळवण्यासाठी सुमारे १,००० मरीन कमांडो (Marine Commandos) या ताफ्यात तैनात करण्यात आले आहेत, जे कोणत्याही क्षणी इराणच्या भूमीवर उतरू शकतात.

दुर्गम पर्वत: अमेरिकेसाठी चक्रव्यूह की इराणची फँटम फोर्स?

जरी अमेरिकेने या जमिनीवरील आक्रमणाची संपूर्ण रूपरेषा तयार केली असली, तरी इराणच्या मुख्य भूमीवर ताबा मिळवणे इतके सोपे नाही. इराणचा बहुतांश भौगोलिक प्रदेश हा अत्यंत दुर्गम, खडकाळ आणि विशाल पर्वतांनी वेढलेला आहे. अशा डोंगराळ भागात रणगाडे आणि पायदळ वाहने पुढे नेणे कोणत्याही आधुनिक लष्करासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि जीवघेणे ठरू शकते.

या पर्वतांच्या आडून गनिमी कावा (Guerrilla Warfare) करण्यासाठी इराणची अत्यंत क्रूर मानली जाणारी ‘फँटम फोर्स’ (Phantom Force) सज्ज आहे. इराणी लष्कराने आधीच सोशल मीडियावर अमेरिकन जहाजांचे फोटो शेअर करून इशारा दिला आहे की, जसे अमेरिकन सैनिक किंवा जहाजे आमच्या ‘झिरो मार्क’च्या सीमेत येतील, तसे ते आमचे थेट लक्ष्य बनतील. त्यामुळे जर अमेरिकेने खरोखरच जमिनीवरून हल्ला केला, तर हे युद्ध जगाला एका भीषण विनाशाकडे घेऊन जाऊ शकते.

Web Title: Us iran war ground invasion plan leak graphic map centcom marines strait of hormuz airstrikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
1

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
2

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
3

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप
4

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.