Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War: महासत्ता पुन्हा आमनेसामने; जिथे अली खामेनी यांना दफन केले जाणार दोन मोठे रेल्वे पूलच अमेरिकेने उडवले

US Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणचा दावा आहे की, अली खामेनी यांच्या दफनापूर्वी अमेरिकेने मशहदकडे जाणारे दोन रेल्वे पूल उडवून दिले. दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 09, 2026 | 01:45 PM
us iran war trump strikes khamenei funeral mashhad railway bridges destroyed

us iran war trump strikes khamenei funeral mashhad railway bridges destroyed

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला
  • सर्वोच्च नेते खामेनी यांच्या अंत्ययात्रेत अडथळा
  • इराणचा तीव्र प्रहार आणि युद्ध पेटण्याची भीती

अमेरिका आणि इराणमधील लष्करी संघर्ष आता अत्यंत धोकादायक आणि विनाशकारी वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने (CENTCOM) इराणमध्ये घुसून थेट रेल्वे नेटवर्कला लक्ष्य केले आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतल्लाह अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या दफनविधीची (अंत्यसंस्कार) तयारी सुरू असतानाच, मशहद शहराकडे जाणाऱ्या दोन प्रमुख रेल्वे पुलांना अमेरिकेने क्रूझ क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने उडवून दिल्याचा खळबळजनक दावा इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) केला आहे.

खामेनी यांच्या अंत्यसंस्कारात व्यत्यय आणण्याचा अमेरिकेचा डाव?

इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भीषण क्षेपणास्त्र हल्ला उत्तर इराणमधील गोलेस्तान प्रांतात असलेल्या ‘अक तेकेह खान’ रेल्वे पुलावर पहाटेच्या सुमारास झाला. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांची शवपेटी इराकी शहरांमधून फिरवून मशहद येथे आणण्यात आली आहे, जिथे लाखो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमले आहेत. इराणचा आरोप आहे की, या ऐतिहासिक अंत्ययात्रेत प्रचंड अडथळा निर्माण करणे आणि मशहद शहराचा संपर्क तोडणे हाच या अमेरिकन क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्याचा मुख्य उद्देश होता. सुरक्षेच्या कारणास्तव मशहद विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून संपूर्ण परिसरात लष्करी नाकेबंदी करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  US Iran War 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेने पेटले युद्ध; चाबहार बंदरासह इराणच्या 90 तळांवर अमेरिकेचा भीषण बॉम्बहल्ला

अमेरिकेचे स्पष्टीकरण: होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेसाठी कारवाई

दुसरीकडे, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) अधिकृत रित्या स्पष्ट केले आहे की, हा हल्ला इराणच्या लष्करी रसद पुरवठ्याची क्षमता कमकुवत करण्यासाठी केला गेला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना इराणकडून असलेला मोठा धोका मोडून काढण्यासाठी अमेरिकेने ही कठोर पावले उचलली आहेत. या स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त असले तरी दोन्ही पुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

🚨🇺🇸🇮🇷 The U.S. bombed Iranian RAILWAY bridges and Trump says Tehran just called wanting a DEAL. -Per Axios, the U.S. bombed two railway bridges in northeastern Iran with cruise missiles, the first American strikes on Iranian infrastructure since the April 8 ceasefire -Trump,… https://t.co/ahQ7PJUyef pic.twitter.com/a0fwmL7gmH — Mario Nawfal (@MarioNawfal) July 9, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Australia Agreement: भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना नवे बळ; अणुऊर्जा, संरक्षण, व्यापार आणि अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक करार

इराणचा अमेरिकन तळांवर भीषण प्रतिहल्ला (IRGC Retaliation)

या ‘विश्वासघातकी’ हल्ल्याला उत्तर म्हणून आयआरजीसीच्या नयनावा कॉर्प्सने तात्काळ प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली आहे. इराणने कुवेत आणि बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांवर (आरिफजान कॅम्प, अली अल-सलेम हवाई तळ आणि शेख ईसा हवाई तळ) शेकडो आत्मघाती ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडल्याचा दावा केला आहे. इराणने याला अमेरिकेविरुद्धचे “पहिले शिक्षात्मक पाऊल” म्हटले असून, अमेरिकेच्या आक्रमकतेपुढे झुकणार नाही, असा इशारा दिला आहे. सध्या मशहदमध्ये लाखो लोक रस्त्यावर असून परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. या दोन्ही देशांमधील थेट क्षेपणास्त्र युद्धामुळे संपूर्ण जगात तिसऱ्या महायुद्धाची भीती पसरली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Us iran war trump strikes khamenei funeral mashhad railway bridges destroyed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
2

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
3

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
4

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.