Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War : अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूनंतर ट्रम्प आक्रमक; इराणला किंमत मोजावी लागणार

US-Iran War Update : अमेरिका इराण युद्ध आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जॉर्डनवर इराणच्या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून वातावरण तापले आहे. ट्रम्प यांनी आक्रमकपणे इराणला कडक इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2026 | 10:38 AM
Trump Warns Iran

Trump Warns Iran

Follow Us
Follow Us:
  • जॉर्डनमधील हल्ल्यात २ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू
  • ट्रम्प आक्रमक
  • इराणला दिला कडक इशारा
US-Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील युद्ध आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. इराणच्या जॉर्डनवरील हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे अमेरिका-इराण तणाव वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आक्रमक इशारा दिला आहे. अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

US-Iran Conflict : होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेच्या ताब्यात? ट्रम्प यांचा मोठा दावा; इराणबाबत खळबळजनक विधान

ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

अमेरिका इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्रचंड तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे इराण आक्रमक झाला असून आखाती देशांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करत आहे. यादरम्यानच जॉर्डनमधील लष्करी तळावरील हल्ल्यात दोन अमेरकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत इराणवर निशाणा साधला. एकाही अमेरिकी सैनिकाचा जीव गेला तर याला तीव्र ताकदीने उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश

दुसरीकडे ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभाग आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही दिले असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन लष्कराच्या तैनात आणि सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इराणचाही अमेरिकेला गंभीर इशारा

दुसरीकडे, इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी युद्ध थांबवण्यासाठी घाईत चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी इराणची भूमिका मजबूत झाल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

इराणच्या ससंदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनीही अमेरिकेवर टीकाक केली. अमेरिकेकडून इराणच्या जवळ लष्करी तैनात केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आखातात अस्थिरता

सध्या दोन्ही देशांतील या तणावामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंच्या आक्रमक भूमिकेमुळे आखाती देशांमध्ये अस्थिरता पसरत चालली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दाखल इराण आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. परंतु या हल्ल्यांमध्ये आखाती देशांतील मुख्य भागांनाही लक्ष्य केले जात आहे. यामुळे आखाती देशांचे मोठे नुकसान होत आहे.


US-Iran Conflict : इराणचा यु-टर्न? अमेरिकेसोबत चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे संकेत; होर्मुझबाबत मोठे विधान

Web Title: Us iran war trump warns iran after us soldiers killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-US War
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
1

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
2

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी
3

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले
4

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.