Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार

US Iran War News: इराणमधील १४० लष्करी तळांवर अमेरिकेने भीषण एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने ५ घातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह अमेरिकेच्या आखाती देशांमधील तळांवर मोठा पलटवार केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 12, 2026 | 10:01 PM
इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार (Photo Credit- Ai)

इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:
  • जगाचे टेन्शन वाढले!
  • इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला
  • पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार
US Iran War News: पश्चिम आशियात (Middle East) पुन्हा एकदा युद्धाचा मोठा भडका उडाला आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या काही तासांतच अमेरिका आणि इराण यांच्यात थेट लष्करी संघर्ष सुरू झाला आहे. अमेरिकेने रविवारी इराणच्या तब्बल १४० लष्करी तळांना लक्ष्य करत जोरदार हवाई हल्ले (Air Strikes) केले. होर्मुजच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) इराणने एका व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून महायुद्धाचे सावट गडद झाले आहे.

होर्मुज जलमार्गावर अमेरिकेचा दावा; इराणचा ताबा नाकारला

अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणने आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून जाणाऱ्या एका जहाजावर हल्ला करून त्याला आग लावली होती. या बेजबाबदार कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने ही लष्करी कारवाई केली आहे. यासोबतच अमेरिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, “होर्मुज स्ट्रेट हा आंतरराष्ट्रीय नियम पाळणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांसाठी खुला आहे. या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलमार्गावर इराणचा कोणताही एकतर्फी ताबा नाही.”

IRGC : ट्रम्पच्या धमकीनंतर इराणी ‘Revenge Policy’वर जागतिक चर्चेत; आधी पण ‘या’ मोठ्या घटनांचा इराणने घेतला होता बदला

इराणचा भीषण पलटवार; ५ अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा केला मारा

अमेरिकेच्या या विनाशकारी हल्ल्यानंतर इराण कमालीचा बिथरला असून त्यानेही अमेरिकेविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने अमेरिकी तळांवर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या पलटवारामध्ये इराणने आपली ५ सर्वात घातक आणि अचूक मारा करणारी प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे मैदानात उतरवली आहेत. यामध्ये कद्र, इमाद, खैबर शेकन, फतेह-११० आणि झोल्फागार या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ही क्षेपणास्त्रे सॉलिड आणि लिक्विड अशा दोन्ही प्रकारच्या इंधनावर चालणारी असून ‘प्रिसिजन गायडेड’ (अचूक लक्ष्य भेदणारी) आहेत. इराणने केवळ सीमेवरच नव्हे, तर बहरीन, कुवेत, कतार आणि ओमान या आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांनाही (US Military Bases) लक्ष्य केले आहे.

शांतता कराराची चर्चा फिस्कटली; युद्धाची ठिणगी नेमकी कशामुळे?

वास्तविक पाहता, या दोन्ही देशांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच कमालीचा तणाव निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वीच दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली असून लवकरच एक मोठा शांतता करार होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ या जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या व्यापारी जलमार्गाच्या अधिकारावरून दोन्ही देशांचे एकमत होऊ शकले नाही. परिणामी, दोन्ही देशांकडून एकमेकांवर सतत हल्ले सुरूच राहिले. आता इराणने अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास साफ नकार दिला आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेनेही आक्रमक भूमिका घेत जर इराणने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा दिला आहे.

Iran-US Crisis: होर्मुझवरून इराणमध्ये अंतर्गत फूट! शक्तिशाली सैन्य ‘IRGC’ युद्ध पुकारण्याच्या तयारीत, तर सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

Web Title: Us launches massive air strikes on 140 iranian targets iran retaliates with 5 deadly missiles marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Internation news
  • iran
  • Middle East War Impact
  • Strait of Hormuz
  • US
  • US Iran war
  • War News

संबंधित बातम्या

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
1

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
2

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज
3

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

Pope Leo Health Update : पोप लिओ यांना फुफ्फुसाचा कर्करोग; शस्त्रक्रियेनंतर व्हॅटिकनने जारी केले मेडिकल बुलेटिन
4

Pope Leo Health Update : पोप लिओ यांना फुफ्फुसाचा कर्करोग; शस्त्रक्रियेनंतर व्हॅटिकनने जारी केले मेडिकल बुलेटिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.