Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naval War: चर्चेआधीच रणशिंग फुंकलं! USने इराणचे ‘Tuska Ship’ गोळीबार करून केले जप्त; ट्रम्प म्हटले, ‘धडा तर शिकवणारच’

US-Iran War: ओमानच्या आखातात अमेरिकेच्या नौदलाने इराणचे 'तुस्का' हे जहाज जप्त केल्यापासून तणाव वाढला आहे. इराणने याला 'समुद्री चाचेगिरी' म्हटले आहे, तर ट्रम्प यांनी नाकेबंदी सुरूच राहील असे जाहीर केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 20, 2026 | 08:45 AM
us navy seizes iranian ship tuska trump warns iran gulf of oman conflict 2026

us navy seizes iranian ship tuska trump warns iran gulf of oman conflict 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकन नौदलाचा थरार
  • ट्रम्प यांचा सज्जड दम
  • इराणचा ‘पायरसी’चा आरोप

US Navy seizes Iranian ship Tuska : जग ज्या शांतता चर्चेची वाट पाहत होते, त्या चर्चेपूर्वीच ओमानच्या आखातात रक्ताचे पाट वाहण्याची चिन्हे दिसत आहेत. इस्लामाबादमध्ये प्रस्तावित अमेरिका-इराण चर्चेच्या (US-Israel Iran War) काही तास आधी अमेरिकन नौदलाने इराणचे ‘तुस्का’ (Tuska) हे मालवाहू जहाज जप्त केल्याने पश्चिम आशियात भीषण तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, हे जहाज चीनकडून इराणकडे जात असताना अमेरिकेने ही मोठी कारवाई केली आहे.

समुद्रात थरार: ‘USS स्प्रुआन्स’ची धडक कारवाई

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर या घटनेची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणचे ‘तुस्का’ जहाज अमेरिकेने लादलेली होर्मुझची नाकेबंदी चोरट्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकन युद्धनौका ‘USS स्प्रुआन्स’ने या जहाजाला वारंवार थांबण्याचे इशारे दिले, परंतु जहाजाच्या कॅप्टनने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अमेरिकन नौदलाने जहाजावर गोळीबार केला आणि मरीन सैनिकांनी जहाजावर ताबा मिळवून त्यातील मालाची तपासणी सुरू केली आहे. ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की, हे जहाज यापूर्वीही बेकायदेशीर कारवायांमध्ये सामील होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RELOSA : 3000 सैनिक, 10 जेट विमाने, 5 युद्धनौका! होर्मुझमधील जहाजावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

इराणचा संताप: “ही समुद्री चाचेगिरी आहे!”

इराणने या घटनेवर अत्यंत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. इराणी परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कृतीला “इंटरनॅशनल पायरसी” (आंतरराष्ट्रीय समुद्री चाचेगिरी) असे संबोधले आहे. इराणचा असा आरोप आहे की, अमेरिकेने विनाकारण गोळीबार करून शस्त्रसंधीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. रिपोर्टनुसार, या कारवाईनंतर काही वेळातच एका इराणी ड्रोनने अमेरिकन युद्धनौकेवर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो अमेरिकेने हाणून पाडला. या एका घटनेमुळे शांतता चर्चेचे भवितव्य आता अंधारात सापडले आहे.

U.S. CENTCOM reports it intercepted and seized the Iranian vessel Touska in the northern Arabian Sea after it failed to comply with multiple warnings over a 6-hour period. U.S. forces then disabled its propulsion by striking the engine room after ordering the crew to evacuate pic.twitter.com/OgCt9Ikn7C — VolgaLad (@cym27s) April 19, 2026

credit – social media and Twitter

नाकेबंदी आणि शांतता चर्चेचा फज्जा

ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, इराणने या चर्चेत सहभागी होण्यास आधीच नकार दिला आहे. इराणच्या मते, अमेरिकेच्या अवाजवी मागण्यांमुळे चर्चा करणे अशक्य आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, “जोपर्यंत अमेरिकेच्या हिताचा करार होत नाही, तोपर्यंत होर्मुझमधील नाकेबंदी (Blockade) सुरूच राहील.” या नाकेबंदीचा फटका केवळ इराणलाच नाही, तर ‘CMA CGM’ सारख्या आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनाही बसत आहे, ज्यांच्या जहाजांवरही या भागात गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.

Trump says that U.S. Marines intercepted and have custody of Iranian-flagged cargo ship, TOUSKA, that ignored warnings and tried to get past the Naval Blockade:” We have full custody of the ship, and are seeing what’s on board!” pic.twitter.com/yFLJdWLZ2Q — Levent Kemal (@leventkemaI) April 19, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Qalibaf : ‘आमच्या नादी लागू नका, अन्यथा पूर्ण ताकदीने ठेचू!’ इराणचे अध्यक्ष गालिबाफ यांची डोनाल्ड ट्रम्प यांना उघड धमकी

जागतिक अर्थव्यवस्थेवर युद्धाचे सावट

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगाचा तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग आहे. येथे होणारा प्रत्येक गोळीबार जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती भडकवणारा ठरत आहे. चीनकडून येणारे जहाज पकडल्यामुळे आता या वादात चीनची भूमिका काय असेल, याकडेही जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेची आक्रमक पवित्रा आणि इराणचा ‘आरपार’चा इशारा यामुळे जगाला आता तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटू लागली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणचे कोणते जहाज जप्त केले आहे?

    Ans: अमेरिकन नौदलाने ओमानच्या आखातात इराणचा ध्वज असलेले 'तुस्का' (Tuska) हे मालवाहू जहाज जप्त केले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी या कारवाईबद्दल काय म्हटले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी सांगितले की, जहाजाने थांबण्याचे इशारे पाळले नाहीत आणि ते नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी ही कारवाई केली.

  • Que: इराणची यावर प्रतिक्रिया काय आहे?

    Ans: इराणने याला "समुद्री चाचेगिरी" म्हटले असून अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Us navy seizes iranian ship tuska trump warns iran gulf of oman conflict 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

इराण युद्ध केवळ एक नाटक? Kamala Harris यांचा मध्यपूर्वेतील संघर्षावरुन खळबळजनक दावा, Trump यांच्यावर गंभीर आरोप
1

इराण युद्ध केवळ एक नाटक? Kamala Harris यांचा मध्यपूर्वेतील संघर्षावरुन खळबळजनक दावा, Trump यांच्यावर गंभीर आरोप

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी
2

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी

Covo Shooting : इटली हादरलं! गुरुद्वाराबाहेर रक्तरंजित थरार; वैशाखीच्या उत्सवापूर्वी दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या
3

Covo Shooting : इटली हादरलं! गुरुद्वाराबाहेर रक्तरंजित थरार; वैशाखीच्या उत्सवापूर्वी दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या

Malaysia Fire : मध्यरात्री गाव पेटलं अन्…. मलेशियात आगीचे तांडव; एका रात्रीत २०० हून अधिक घरे जळून खाक, थरारक VIDEO
4

Malaysia Fire : मध्यरात्री गाव पेटलं अन्…. मलेशियात आगीचे तांडव; एका रात्रीत २०० हून अधिक घरे जळून खाक, थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.