US President Donald Trump met Syrian President Al-Shara at Riyadh
रियाध: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या सौदी अरेबियामध्ये आहेत. ट्रम्प चार दिवसांच्या मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर असून त्यांनी सौदी अरेबियाला भेट दिली आहे. ट्रम्प यांनी रियाधमध्ये सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये मोठा संरक्षण करारा करण्यात आला. याच वेळी ट्रम्प यांनी सीरियाच्या नव्या अंतरिम सरकारचे राष्ट्राध्यक्ष अल-जुलानी यांची भेट घेतली.
मीडिया रिपोर्टनुसार, दोन हजार वर्षानंतर अमेरिकेची ही सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांना पहिलीच भेट होती.दरम्यान सौदीच्या भेटीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कतार आणि यूएई दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
दरम्यान अल-जुलानी यांना दहशतवादी म्हणून ओळखले जाते. अल-शाम तहरीर या विद्रोही गटाचे अल-जुलानी प्रमुख आहेत. दरम्यान सीरियामध्ये असद च्या सत्तापलटानंतर अल-जुलानी यांचे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान रियाधमध्ये अल-जुलानी यांची ट्रम्प यांनी भेट घेतली असून या भेटीदरम्यान सौदीचे क्राऊन प्रिन्स देखील उपस्थित होते. तसेच तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी ऑनइलान बैठीकत उपस्थिती दर्शवली.
अल-जुलानी यांच्यावर अमेरिकेने १० लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. परंतु गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जुलानी यांच्या अध्यक्षतेखाली सीरियात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. यानंतर हा पुरस्कार हटवण्यात आला.
सीरियामध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हयात-तहरीरच्या गटाने अदस सत्तेला पलटवून लावले. असदला इराणचा पाठिंबा मिळत होता. परंतु तहरीर-अल-शाम (HTS)विद्रोही गटाने असदची संत्ता संपुष्टात आणली आणि एचटीएसची सत्ता स्थापन केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावरील सर्व निर्बंध हटवण्याची घोषण केली. तुर्की आणि सौदी अरेबियाच्या आवाहनावरुन त्यांनी हे केल्याचे म्हटले. सीरियात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
या दौऱ्यादरम्यान अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेकडून १४२ अब्ज डॉलर्सच्या किमतीची शस्त्रे खरेदी केली आहेत. तसेच ट्रम्प यांनी ही गुतंवणूक १ ट्रिलियन डॉलरुपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान अमेरिका आणि सौदी अरेबियामधील वाढत्या मैत्रीचा सर्वात मोठा झटका इस्रायलला बसल आहे. सौदी अरेबियाने नेहमीच इस्रायलविरोधी भूमिका स्वीकारली आहे.
याच वेळी या दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे क्रेडिट घेतले आहे. त्यांनी पुन्हा एकदा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासमोर स्वत:ची बढाई मारली आहे.