Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी

Venezuela Earthquake Update : व्हेनेझुएलात झालेल्या सलग दोन भूकंपानी प्रचंड हाहा:कार माजवला आहे. या भूकंपात सध्या ३२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यूएसजीएसने मृतांचा आकाडा १० हजार पार होण्याची भीती व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 02:12 PM
Venezuela Earthquake

Venezuela Earthquake

Follow Us
Follow Us:
  • अखेर मृतांचा आकडा समोर
  • तब्बल ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू
  • शेकडोहून अधिक जखमी
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : व्हेनेझुएलात अवघ्या ४० सेकंदात झालेल्या दोन अत्यंत शक्तिशाली भूकंपाने प्रचंड विध्वंस घडला आहे. या भूकंपाने संपूर्ण व्हेनेझुएलाला हादरवून टाकले असून देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. पहिल्या भूकंपाची तीव्रता ही ७.२ इतकी होती, तर दुसरा भूकंप हा ७.५ रिश्टर स्केलचा अत्यंत धोकादायक होता. दुसऱ्या भूंकापाने राजधानी काराकससह देशाच्या अनेक भागांत इमारती कोसळल्या असून अनेक लोक मलब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे.

Venezuela Earthquake : 40 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाचा थरार; विमातळाचं छत कोसळलं अन्…; VIDEO VIRAL

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

बीबीसी ने दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानीची शक्यता आहे. यूएस जिओलॉजिकल सर्वेनुसार, मृतांचा आकडा १० हजार च्या वर जाण्याची ४४% शक्यता आहे. सध्या ३२ जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे.

मदत आणि बचाव कार्य सुरु

सध्या राजधानी काराकससह देशातील अनेक भागांत परिस्थिती गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवांना तातडीने बचाव कार्याचे आदेश देण्यात आले आहेत. बचाव पथके बहुमजली इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे. व्हेनेझुएलाच्या गृहमंत्र्यांनी लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आव्हान केले आहे.

20 हून अधिक आफ्टरशॉक

मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातील दोन शक्तिशाली भूकंपानंतर २० हून अधिक आफ्टरशॉक जाणवले आहेत. देशाच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात ला गुएरा, अरागुआ, काराबोबो आणि फाल्कॉन या राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. भूकंपतज्ज्ञांनी आणखी काही आफ्टरशॉक बसण्याची शक्यता वर्तवली आहे. हा व्हेनेझुएलाच्या इतिहासातील दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे.  यापूर्वी १९८२ मध्ये व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाने ३०,००० लोकांचा बळी घेतला होता.

व्हेनेझुएलात भूकंप का होतात ?

यूएसजीएस च्या माहितीनुसार, व्हेनेझुएला कॅरेबियन आणि दक्षिण अमेरिकन टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेला आहे. या टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर घर्षण होते आणि कंपने बाहेर पडतात. या कंपनांना भूकंप म्हटले जाते. या प्लेट्समधील फॉल्ट लाइन्सवर अचानक वेगाने हालचाली झाली की भूकंप (Earthquake) घडतो.

Tenemos un objetivo central y esencial: salvar vidas en unión nacional, unidos vamos a superar esta tragedia. pic.twitter.com/OXlmrKZo9m — Delcy Rodríguez (@delcyrodriguezv) June 25, 2026

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाचा डे ऑफ डूम? भूकंपानंतर मृत्यूंचा आकडा १० हजार पार जाण्याची भीती, देशात आणीबाणी जाहीर

Web Title: Venezuela earthquake at least 32 killed 700 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.