War Alert : इराणनंतर आता आशियाई देशांमध्ये युद्ध पेटणार? जपानने चीनच्या दिशेने तैनाती केली खतरनाक क्षेपणास्त्रे (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Strait Of Hormuz :अमेरिकेची नाकेबंदी? इराणने होर्मुझवरुन घेतला ‘हा’ मोठा निर्णय, इस्रायललाही झटका
मिळालेल्या माहितीनुसार, जपानने आपल्या संरक्षण धोरणात मोठा बदल केला आहे. या धोरणांतर्गत स्वसंरक्षणासाठी चीनच्या दिशेने लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्र तैनात केली आहे. मध्यपूर्वेतील वाढता धोका आणि आशियाई देशांमधील वाढता प्रादेशिक तणाव पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जपानने म्हटले आहे. मात्र जपानच्या या निर्णयाने आशियातील भू-राजकीय समीकरणात मोठा भूकंप आला आहे.
जपान (Japan)आणि चीनमधघ्ये पूर्व चीन समुद्रातील सेनकाकू बेटांवरुन वाद सुरु आहे. हे बेट सध्या जपानच्या ताब्यात असून चीनने त्यावर आपला हक्क सांगितला आहे. तसेच चीनने तैवानलाही आपला भाग मानले आहे. जपान तैवानला संरक्षणासाठी उघड पाठिंबा देतो. जपानच्या तैवानवरील भूमिका आणि सेनकाकू बेटावरुन वादामुळे चीनसोबत तणावात आहे. परंतु सध्या या जपानच्या हालचालीमुळे चीन संतप्त होऊन आशियाई देशांमध्येही युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
Ans: जपानने चीनच्या दिशेने लांब पल्ल्याची खतरनाक क्षेपणास्त्रे तैनात केली आहे.
Ans: जपान आणि चीनमधघ्ये पूर्व चीन समुद्रातील सेनकाकू बेटांवरुन वाद सुरु आहे.






