Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्तांची गरळ! “अमेरिकेने हल्ला केल्यास दिल्ली-मुंबईला उडवू”; अब्दुल बासित यांचे चिथावणीखोर विधान

पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताच्या दिल्ली आणि मुंबई शहरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केल्यास भारत आमचे पहिले लक्ष्य असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 22, 2026 | 08:37 PM
अब्दुल बासित यांचे चिथावणीखोर विधान (Photo Credit- X)

अब्दुल बासित यांचे चिथावणीखोर विधान (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्तांची गरळ!
  • “अमेरिकेने हल्ला केल्यास दिल्ली-मुंबईला उडवू”
  • अब्दुल बासित यांचे चिथावणीखोर विधान
मध्यपूर्वेतील (Middle East) वाढता तणाव आणि जागतिक भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताच्या विरोधात पुन्हा एकदा अत्यंत प्रक्षोभक विधान केले आहे. “जर अमेरिकेने कधी पाकिस्तानवर हल्ला केला किंवा आमच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला लक्ष्य केले, तर प्रत्युत्तर म्हणून भारतावर हल्ला करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही,” असे बासित यांनी म्हटले आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी हे चिथावणीखोर विधान केले.

नेमके प्रकरण काय?

अब्दुल बासित यांनी हे विधान अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर केले आहे. गॅबार्ड यांनी पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलने बासित यांना ‘सर्वात वाईट परिस्थिती’ (Worst Case Scenario) विचारली असता, त्यांनी थेट भारताच्या दिल्ली आणि मुंबई या शहरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली.

“If America attacks Pakistan, we’ll nuke India. Our missiles may not reach America but we’ll destroy Delhi & Mumbai.” – Pak’s former high commissioner to India Abdul Basit Rabid Islamism for you. And there is a bunch in India who wants Aman ki Aasha.pic.twitter.com/nvThPsawfw — Pakistan Untold (@pakistan_untold) March 21, 2026

“भारतावर हल्ला करण्याशिवाय पर्याय नाही”

चर्चेदरम्यान बासित यांना विचारण्यात आले की, “जर परिस्थिती बिघडली आणि अमेरिकेने पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानकडे काय पर्याय असेल?” यावर उत्तर देताना बासित म्हणाले, “अशा स्थितीत आम्हाला काहीही विचार करण्याची गरज नाही. जर कोणी आमच्यावर वाईट नजर टाकली, तर आम्ही थेट मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला केला पाहिजे. त्यानंतर काय होईल ते आपण नंतर पाहू. जरी आमचा संघर्ष अमेरिकेशी असला, तरी जगाला हे माहित असले पाहिजे की अशा परिस्थितीत पाकिस्तान भारतालाच लक्ष्य करेल.”

US Iran War : अमेरिकेला कोटींचा फटका! इराणने पाडले सर्वात शक्तिशाली F-15 फायटर जेट; पहा थरारक VIDEO

तुलसी गॅबार्ड यांच्यावर टीका आणि क्षेपणास्त्र क्षमतेवर भाष्य

अब्दुल बासित यांनी यावेळी भारतीय वंशाच्या अमेरिकन अधिकारी तुलसी गॅबार्ड यांच्यावरही टीका केली. “तुलसी गॅबार्ड यांचा दृष्टीकोन नेहमीच पाकिस्तान विरोधी राहिला आहे. त्यांनी आमची क्षेपणास्त्रे पाहिली, पण भारताची अग्नी-5 आणि अग्नी-6 ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे त्यांना दिसत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, “आमची मारक क्षमता वाढावी आणि भविष्यात आम्ही इस्रायललाही लक्ष्य करू शकू, अशी मी प्रार्थना करतो,” असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले.

“अमेरिका आमचा धोरणात्मक भागीदार कधीच होणार नाही”

2014 ते 2017 या काळात भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिलेल्या बासित यांनी अमेरिकेसोबतच्या संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले, “भारत हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर परिस्थिती काहीशी सुधारेल असे आपल्याला वाटते, पण हे लक्षात ठेवा की अमेरिका दीर्घकाळ पाकिस्तानचा भागीदार राहणार नाही. आपण ट्रम्प प्रशासनाकडून जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा घ्यावा, पण आपण त्यांचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहोत या भ्रमात राहू नये.”

तज्ज्ञांचे मत आणि प्रादेशिक तणाव

अब्दुल बासित यांनी यापूर्वीही अनेकदा भारतविरोधी विधाने केली आहेत. मात्र, अण्वस्त्रधारी देशांच्या संदर्भात अशा प्रकारची भाषा वापरणे आंतरराष्ट्रीय शिष्टाचारांच्या विरोधात असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. बासित यांचे हे विधान जागतिक स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा अधिक मलिन करू शकते. सध्या दक्षिण आशियामध्ये आधीच तणावाचे वातावरण असताना, अशा चिथावणीखोर विधानांमुळे प्रादेशिक अस्थिरता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Iran war strategy : खामेनेईंनी मृत्यूपूर्वीच रचले होते चक्रव्यूह? इराणच्या सूडाने ट्रम्प-नेतन्याहूंची उडाली झोप; जगाला मोठा इशारा

Web Title: We will blow up delhi and mumbai if america attacks abdul basits provocative statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Iran US Israel
  • pakistan
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
1

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
2

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

Independence Day: पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो, मग बलुचिस्तानात 11 ऑगस्ट का महत्त्वाचा? जाणून घ्या इतिहास
3

Independence Day: पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो, मग बलुचिस्तानात 11 ऑगस्ट का महत्त्वाचा? जाणून घ्या इतिहास

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
4

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.