100 दिवसांचा प्लॅन अन् रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरु; ट्रम्प यांच्या योजनेमुळे झेलेन्स्कींची उडाली झोप(फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
कीव: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युद्धबंदीसाठी नकार दिला त्यानंतर ट्रम्प यांनी एक नवी योजना आखली आहे. यामध्ये त्यांनी रशिया आणि युक्रेनला युद्ध संपण्यासाठी 100 दिवसांची मुदत दिली आहे. यामुळे पुतिन यांना युक्रेनला संपुष्टात आणण्यासाठी वेळ मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे झेलेन्स्कींची चिंता वाढली असून त्यांनी नाटो देशांशी युद्धबंदीसाठी चर्चा सुरु केली आहे. खरंतर डोनाल्ड ट्रम्पयांनी निवडणुकीच्या वेळी शपथ घेतल्यानंतर 24 तासांत युद्ध संपवण्याचे आश्वासन दिले होते.
यासंबंधी त्यांनी रशियाला धमकी देखील दिली होती. मात्र पुतिन यांनी याला स्पष्टपणे नकार दिल्याने ट्रम्प यांनी 100 दिवसांची योजना आखली. सध्या या 100 दिवसांत युद्धबंदीच्या योजनेवर कार्य सुरु झाले आहे, मात्र या योजनेमुळे युक्रेनचे मोठे नुकसान होऊ शकते असते तज्ज्ञांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या नव्या योजनेमुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की या कालावधीत रशियाला युक्रेनमधील दक्षिण-पूर्व भागांवर पूर्णपणे कब्जा करण्याची संधी मिळू शकते अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकी योजना?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या 100 दिवसांच्या योजनेनुसार, युक्रेनला हरवलेल्या प्रदेशांचा ताबा रशियाला सुपूर्त करावा लागणार आहे, तसेच रशियाने कब्जा केलेल्या युक्रेनच्या प्रदेशांमधून माघार घ्यावी लागेल. याशिवाय, नाटोने रशियावर लादलेल्या निर्बंधांचाही पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे या योजनेत म्हटले आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनवरील आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. रशियन सैनिक वेगाने पुढे सरकत आहेत आणि गुड फ्रायडेपूर्वी अधिकाधिक प्रदेशांवर कब्जा करण्याचा रशियाचा उद्देश आहे. कुर्स्क प्रदेशातून युक्रेनियन सैन्याला हटवून, रशियाच्या कोणत्याही भागावर युक्रेनचा ताबा राहू नये, याची काळजी पुतिन घेत आहेत.
युक्रेनच्या भवितव्याबद्दल अनिश्चितता
या परिस्थितीत, झेलेन्स्की यांनी युद्धविरामाच्या या योजनेला रोखण्यासाठी नाटो देशांशी चर्चा सुरु केली आहे. ट्रम्प यांच्या नव्या योजनेमुळे युरोमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून युक्रेनच्या भवितव्याबद्दल अनिश्चितता वाढली आहे. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी युक्रेनला शस्त्र पुरवठ्याची मदत थांबवली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युक्रेनला शस्त्रस्त्र पुरवठा थांबवण्याच्या निर्णायामुळे आदेशाचा विकासापासून ते लष्करी मदतीपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या या 100 दिवसांच्या योजनेमुळे युक्रेनला आपल्या हरवलेल्या प्रदेशांचा ताबा सोडावा लागेल, यामुळे झेलेन्स्की यांच्या चिंतेत भर पडली आहे. रशियाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या सैन्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, आणि या परिस्थितीत ट्रम्प यांच्या योजनेचे परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.