Buldhana Census Staff Training
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात घरयादी तयार करणे आणि गणना गट निश्चित करणे, ही कामे करण्यात येणार आहे. या प्रक्रियेचे प्रभावी नियोजन करून प्रत्यक्ष जनगणनेच्या कामासाठी यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जिल्हास्तरीय प्रशिक्षणात जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रवीण भगत तसेच सांख्यिकी अन्वेषक वर्ग-२ निहाल धरंधरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पूर्वतयारी, कामकाजाची पद्धत आणि जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले.
जनगणनेचा दुसरा टप्पा व्यापक स्वरूपाचा असल्याने मोठ्या प्रमाणात प्रगणक, पर्यवेक्षक आणि प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित यंत्रणेतील अधिकारी या प्रशिक्षणास उपस्थित आहेत. या प्रशिक्षणासाठी जनगणना कक्षाच्या संजीवनी मुंपडे, तहसीलदार (सामान्य प्रशासन), पी. के. करे, नायब तहसीलदार तसेच सहायक महसूल अधिकारी अपेक्षा जाधव यांनी सहकार्य केले.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीकडून ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांची सामाजिक व आर्थिक स्थिती जाणून घेण्यात येणार आहे. नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन संकलित माहितीची पडताळणी करणार आहेत. जनगणनेच्या प्रत्यक्ष कामकाजादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
Ans: घरयादी तयार करणे आणि गणना गट निश्चित करणे ही कामे होणार आहेत.
Ans: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी उद्घाटन केले.
Ans: प्रत्येक व्यक्तीकडून ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे.






