
फोटो सौजन्य सोशल मीडिया
इस्रायल मात्र अमेरिकेला इराणवर हल्ला करायला लावून अलगद शांतपणे बाहेर पडला असून आपल्या पुढील धोरणासाठी काम करत आहे . लेबनॉन आणि गाझा मध्ये अतिक्रमण सुरूच आहे . जर दोन तीन दिवसाआड पॅलेस्टानी नागरिकांच्या मृत्यूच्या बातम्या या येतच आहेत . हाच संघर्ष वाढत वाढत आता सौदी अरेबिया आणि येमेन मधील हुतींच्यात सुरु झाला आहे .
हा सगळा पेटलेला भडका शांत करण्यासाठी इराणने पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून उपलब्ध माहितीनुसार इराणकडून अमेरिकेसमोर मुख्यतः एक ७ दिवसांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता . त्यात होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे , अमेरिकेची नाकेबंदी आणि काही निर्बंध हटवणे आणि त्यानंतर अणुकार्यक्रमावर चर्चा सुरु करण्याचा रोडमॅप आहे . पण ट्रम्प यांनी तो प्रस्ताव नाकारला .
इराणचा ७ दिवसांचा प्रस्ताव ट्रम्प यांनी नाकारल्यानंतर , इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी कतारच्या मध्यस्थीने या प्रस्तावावर काही नवीन कल्पना किंवा दुरुस्त्या चर्चेत आणल्या आहेत . याला Fresh Ideas असे नाव देण्यात आलेले आहे . पण त्यांना स्वतंत्रपणे अनेक औपचारिक इराणी प्रस्ताव म्हणून पाहता येणार नाही . आता हा नवीन प्रस्ताव कतारच्या माध्यमातून अमेरिकेसमोर मांडला जाणार आहे .
इराणचा आधीचा शांतात प्रस्ताव नाकारल्यावर इराणने पुन्हा कतारच्या माध्यमातून अमेरिकेला प्रस्ताव पाठवला आहे . हे करून इराण ने पुन्हा एकदा जगासमोर आपल्याला शांतात हवी आहे , युद्ध नको आहे अशी भूमिका मांडली आहे . जसे कि इराण नेहमीच सांगत आला कि आम्ही कधीच युद्ध सुरु करत नसून शत्रू राष्ट्राच्या हल्ल्यावर उत्तर म्हणून प्रतिहल्ला करत असतो .
इराणच्या या भूमिकेने पुन्हा एकदा बॉल हा अमेरिकेच्या कोर्टात टाकला आहे . आता अराघची यांनी वॊशिंग्टनच्या अंतिम भूमकेची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे . कतारमार्फत अमेरिकेचा प्रतिसाद लवकरच मिळेल , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे .
इराण अमेरिका हे युद्ध सुरवातीला इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचा आरोप करत सुरु झाले . नंतर युद्धामुळे इराणने आपली बाजू भक्कम करण्यासाठी होर्मूझ बंद करून दाखवले . होर्मूझ वर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका अजून पर्यंत मेहनत घेत आहे . पण इराण अमेरिकेच्या मेहनतीवर तेच होर्मूझचे पाणी मारत आहे . होर्मूझ हा जगाच्या जलवाहतुकीचा महत्वाचा मार्ग आहे .
होर्मूझला पर्याय लाल समुद्रातील बाब अल मंदेब पण हुतींनी बंद केला आहे . यामुळे जगभरातून अमेरिकेवर दबाव येत असून होर्मूझ पुन्हा सुरु करणे खूप गरजेचे आहे . सध्या तरी जगाला अमेरिकेशिवाय , अमेरिकेला होर्मूझशिवाय आणि होर्मूझला इराणशिवाय पर्याय नाही .