Middle East Conflict : मोदींचा एक फोन अन् युद्ध थांबणार! Iran-Israel युद्धावर 'या' देशाच्या बड्या अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Middle East War : BRICS मध्ये फूट? इराणवरील हल्ल्याने सदस्य देश भिडले; भारत नेमका कोणाच्या बाजूने?
UAE चे माजी राजदूत हुसैन हसन मिर्जा यांनी म्हटले आहे की, “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा केवळ एक फोन कॉल या भीषण युद्धाला पूर्णविराम देऊ शकतो.’ मिर्जा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “पंतप्रधान मोदींचा सन्मान केवळ अरब देशातील नेतेच नव्हे, तर तेथील जनताही करते.
इराण-इस्रायल या दोन्ही देशांसोबत भारताचे मैत्रीपूर्ण आणि संतुलित संबंध आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींनी या देशाच्या सर्वोच्च नेत्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधून तणावावर तोडगा काढवा. त्यांच्या शब्दाला मध्यपूर्वेत मोठी किंमत आहे,” असे मिर्जा यांनी म्हटले.
मिर्जा यांनी असेही स्पष्ट केले की, सध्या मध्यपूर्वेतील युद्ध अधिक लांबणीवर पडत आहे. यूएईला हे युद्ध अधिक काळ लांबलेले नको असून त्यांनी आपल्या भूमीचा वापर कोणत्याही हल्ल्यासाठी होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींचा फोन गेमचेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर इराण आक्रमक झाला आहे. इराणने मध्यपूर्वेतील आखाती देशांना लक्ष्य केले असून युएईच्या दुबई येथे भीषण हल्ला केला आहे. यामुळे सध्या युएईमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मिर्जा यांनी युद्ध थांबवण्यासाठी भारताच्या मदतीची विनंती केली आहे.
सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अमेरिका (America)-इस्रायल (Israel) त्यांच्या सामरिक हितसंबंधासाठी तर इराण त्याच्या अस्तित्वासाठी लढत आहे. मात्र याचा जागतिक स्तरावरही गंभीर परिणाम होत असून भारताकडे एक शांतीदूत म्हणून पाहिले जात आहे. आता प्रश्न पडतात की, खरेच पंतप्रधान मोदींच्या एका फोनवर युद्ध थांबेल, भारताची मध्यस्थी मध्यपूर्वेतील स्थिरतेसाठी गेमचेंजर ठरेल? भारत मध्यस्थी करेल का?
Iran-Israel War : अमेरिकेला युद्धामुळे दिवसेंदिवस बसतोय ‘असा’ मोठा फटका; संघर्षामुळे थेट…
Ans: UAE चे माजी राजदूत हुसैन हसन मिर्जा यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यपूर्वेतील युद्ध थांबवू शकतात असे म्हटले आहे.
Ans: मिर्जा यांच्या मते, पंतप्रधान मोदींचा मध्यपूर्वेत मोठा आदर आहे. तसेच इराण इस्रायलच्या नेत्यांशी त्यांचे चांगले कूटनीतिक संबंध आहे. यामुळे त्यांनी संवाद साधल्यास युद्ध थांबू शकते.






