
Massive Drone Strike Near Barakah Nuclear Plant Sparks Middle East Tension
यूएईच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला प्रकल्पाच्या मुख्य आणि अंतर्गत सुरक्षेच्या बाहेर असलेल्या जनरेटरवर झाला आहे. हल्ला होताच मोठा स्फोट झाला आणि आग लागली. परंतु सुरक्षा दलांनी आणि अग्निशामक अधिराऱ्यांनी तातडीने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय फेडरल ऑथॉरिटी फॉर न्यूक्लियर रेग्लेल्यूशनने या हल्ल्यामुळे अणु सुरक्षेला किंवा रेडिएशनला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकल्पातील सर्व युनिट्स सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
अमेरिका इराणमधील तणाव गेल्या काही काळात कमालीचा वाढला आहे. या काळात आतापर्यंत यूएईवर तब्बल २,८०० हून अधिक वेळा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. बराकाह अणू प्रकल्प हा संपूर्ण अरब जगताली पहिला व्यावसायिक अणुउर्जा प्रकल्प आहे. हा देशाची २५% विजेची गरज पूर्ण करतो. या प्रकल्पावर हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही. परंतु नुकत्या झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. मात्र, इराणने हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अमेरिका-इराण शांतता चर्चा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच होर्मुझमध्ये तणाव वाढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
Authorities in Abu Dhabi responded to a fire incident that broke out in an electrical generator outside the inner perimeter of the Barakah Nuclear Power Plant in the Al Dhafra Region, caused by a drone strike. No injuries were reported, and there was no impact on radiological… — مكتب أبوظبي الإعلامي (@ADMediaOffice) May 17, 2026