Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
Maharashtra to National And International Breaking News:
Sunetra Pawar PK Meeting: प्रशांत किशोर यांच्या अटीमुळे राष्ट्रवादीत वाद
प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि बिहारमधील नवनिर्वाचित आमदार प्रशांत किशोर (PK) व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या भेटीदरम्यान प्रशांत किशोर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. आपल्याकडून काम हवे असल्यास प्रदेशाध्यक्षपदाबाबत तातडीने निर्णय घ्यावा लागेल, अशी थेट अटच प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
08 Aug 2026 09:23 AM (IST)
Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार परदेशी निधी नियंत्रणात आणण्यासाठी परदेशी निधी (सुधारणा) विधेयक (FCRA Bill) सभागृहात मांडण्याच्या तयारीत असून, या मुद्द्यावरून काँग्रेससह संपूर्ण विरोधी 'इंडिया' आघाडी सरकारला घेरण्यासाठी आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी आपल्या सर्व खासदारांना तीन ओळींचा कडक व्हिप बजावला असून, १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी सभागृहात अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हे विधेयक गृह मंत्रालयाशी संबंधित असल्याने सोमवारी (१० ऑगस्ट) लोकसभेत FCRA बिल मांडले जाण्याची शक्यता असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात उपस्थित राहू शकतात. या रणनीतीबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी सकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली.
08 Aug 2026 09:15 AM (IST)
Arunachal Pradesh Border Issue: भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशातील विविध भागांवर दावा सांगत स्वतःच्या नकाशात तिथली नावे बदलण्याचा खोडसाळपणा करणाऱ्या चीनला भारताने पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. अरुणाचल प्रदेशातील २७ महत्त्वाची ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची अधिकृत व प्रमाणित भारतीय नावे आता थेट भारताच्या अधिकृत नकाशात समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारत आणि चीन दरम्यान सीमावादावरून सतत तणावाचे वातावरण राहिले आहे. चीन वारंवार अरुणाचल प्रदेशातील भागांवर हक्क सांगत तेथील ठिकाणांना चिनी नावे देऊन नकाशे प्रसिद्ध करत असतो.
08 Aug 2026 09:07 AM (IST)
Abhijeet Dipke Viral Video: दिल्लीतील जंतर-मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर दीपके सध्या छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी असून, तिथे पक्षाची आगामी रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा थेट आरोप करत अभिजीत दीपके अत्यंत संतापल्याचे पाहायला मिळाले. यावरून दीपके आणि पोलिसांमध्ये घटनास्थळीच जोरदार बाचाबाची झाली.
08 Aug 2026 09:02 AM (IST)
Arunachal Pradesh Border Issue: भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशातील विविध भागांवर दावा सांगत स्वतःच्या नकाशात तिथली नावे बदलण्याचा खोडसाळपणा करणाऱ्या चीनला भारताने पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. अरुणाचल प्रदेशातील २७ महत्त्वाची ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची अधिकृत व प्रमाणित भारतीय नावे आता थेट भारताच्या अधिकृत नकाशात समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
भारत आणि चीन दरम्यान सीमावादावरून सतत तणावाचे वातावरण राहिले आहे. चीन वारंवार अरुणाचल प्रदेशातील भागांवर हक्क सांगत तेथील ठिकाणांना चिनी नावे देऊन नकाशे प्रसिद्ध करत असतो. मात्र, भारताने स्वतःच्या अधिकृत नकाशात या २७ ठिकाणांची मूळ भारतीय नावे ठामपणे नोंदवून चीनचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत. भारताच्या या कडक आणि ऐतिहासिक निर्णयामुळे चीनची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कोंडी झाली आहे.
08 Aug 2026 08:54 AM (IST)
Salman Khan Security Guard Death: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील 'गॅलेक्सी अपार्टमेंट'बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश रायते (वय ४१) असे या मृत कॉन्स्टेबलचे नाव असून, हृदयविकाराच्या (कार्डिॲक अरेस्ट) तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गुरुवारी संध्याकाळी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गार्ड ड्युटीवर असताना गणेश रायते यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या धमक्या आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे सलमान खानला 'Y+' दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून, त्याच्या घराबाहेर २४ तास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असतो.
07 Aug 2026 06:25 PM (IST)
नेक्सॉनचे एक दशक आणि ११ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास साजरा करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स (टीएमपीव्ही) या भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज ९.९९ लाख रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या सुरुवातीच्या किमतीत नेक्सॉन कॅमोच्या लाँचची घोषणा केली.






