मुंबई : सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरुण वर्मा (Arun Verma) यांचे बुधवारी मध्यरात्री 2 वाजता भोपाळ येथील पीपल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 62 वर्षांचे होते.
अरुण वर्मा यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना श्वासोच्छवास करण्यास खूप त्रास होत होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, नंतर त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांनी काम करणे पूर्णपणे बंद केले. शेवटी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.’
अरुण वर्मा यांनी जेपी दत्ता यांच्या दिग्दर्शनाखालील ‘डकैत’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये एन्ट्री केली. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. ‘हिना’, ‘खलनायक’, ‘प्रेम ग्रंथ’ , ‘नायक’ , ‘मुझसे शादी करोगी’ , ‘हिरोपंती’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या.