१० मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. यात सर्वात जास्त लक्ष लागलं आहे ते उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे. भाजप युपीमध्ये पुन्हा आपली सत्ता स्थापन करणार का? भाजपला एकहाती बहुमत मिळणार का? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजप उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन करण्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला. पंजाबमध्येही भाजपची स्थिती मजबूत होईल, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाला मिळाला असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
[read_also content=”उत्तर प्रदेश सह पाच राज्यांचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी, संध्याकाळी ७ वाजता फक्त navarashtra.com वर https://www.navarashtra.com/assembly-election-2022/exit-polls-of-five-states-including-uttar-pradesh-at-one-place-from-7-pm-only-on-navarashtra-com-nrvb-250841.html”]
भाजपला उत्तरप्रदेशात २६ ते ३० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला असून काँग्रेस ३५ ते ४० जागांवर समाधान मानेल असं सांगितलं जात आहे. बसपला २ ते ३ जागा मिळतील तर अन्य पक्ष १ ते ३ जागांवर विजयी होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
CNN News18 ने यूपीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजप आघाडीला २४० जागा मिळतील असे सांगितले जात आहे. समाजवादी पक्षाला १४० जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला १७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
युपी निवडणुकीचे एक्झिट पोल भाजपचे पुनरागमन दर्शवतात. सीएनएन न्यूज-18 ने भाजप युतीला २६२-२७७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा एक्झिट पोल सपा आघाडीला ११९-१३४ जागा देत आहे. ईटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार यूपीमध्ये भाजप+ला २३०-२४५ जागा मिळतील तर एसपी+ला १५०-१६५ जागा मिळतील. Newsx-Polstrat चा एक्झिट पोल भाजपा+ २११-२२५ जागा आणि SP+ १४६-१६० जागा देत आहे.
रिपब्लिक टीव्हीने मॅट्रिझसह एक्झिट पोल डेटा जारी केला आहे. यूपीमध्ये भाजप आघाडीला २६२ ते २७७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच योगी आदित्यनाथ सरकार वाचवण्यात यशस्वी ठरतील. सपा आघाडीला ११९-१३४ जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला ७ ते १५ जागा मिळू शकतात. काँग्रेसची खराब कामगिरी यावेळीही कायम राहण्याची शक्यता आहे.
यावेळी उत्तर प्रदेशातील मतदारांची होळी रंगतदार होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी केला. गाझीपूर जिल्ह्यातील नागौरा विधानसभा जागेवर मतदान केल्यानंतर केंद्रीय मंत्री म्हणाले की, मतदारांनी मोठ्या उत्साहात भाजपच्या बाजूने मतदान केले आहे आणि १० मार्च रोजी राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.