(फोटो सौजन्य-AI एआय)
ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी या ॲम्पियरच्या मूळ कंपनीने भारतात आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकल ‘झायबर’ साठी डिझाइन पेटंट दाखल केले आहे. कंपनीने हे डिझाइन पेटंट दाखल केल्यामुळे या ऑल-इलेक्ट्रिक बाइकचे काम अजूनही वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, लवकरच याचे प्रॉडक्शन-रेडी मॉडेल रस्त्यावर धावताना दिसू शकते. ही गाडी २०२७ च्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’मध्ये प्रदर्शित केली जाण्याची शक्यता आहे.
आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स
ॲम्पियर झायबर ही नेकेड स्ट्रीटफायटर डिझाइनसह सादर केली जाणार आहे. या बाइकची थेट स्पर्धा बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या ओला रोडस्टर एक्स, ओबेन रोर एव्हो आणि रिव्हॉल्ट आरव्हिए ४०० शी असेल.
व्हील्स आणि ब्रेक्स: या बाइकमध्ये १७-इंच फ्रंट आणि रिअर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आणि सिंगल-चॅनेल एबीएस दिले आहे.
मोटर आणि स्पीड: यात ८ ते १० kW ची मोटर वापरली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ही बाइक १०० किमी/तासचा टॉप स्पीड गाठू शकते.
रेंज आणि चार्जिंग: एका पूर्ण चार्जमध्ये ही बाइक १८० ते २०० किलोमीटरची रेंज देईल. ही बाइक एसी होम चार्जिंग आणि डीसी फास्ट चार्जिंग या दोन्ही पर्यायांना सपोर्ट करेल.
आधुनिक फीचर्स आणि कनेक्टिव्हिटी
नुकत्याच लाँच झालेल्या ॲम्पियर मॅग्नस जी मॅक्स या स्कूटरप्रमाणेच ‘झायबर’मध्येही हाय-टेक फीचर्स पाहायला मिळतील. यात ५-इंच पीएमव्हीए डिजिटल क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, जिओ-फेन्सिंग आणि ओव्हर-द-ॲअर (OTA) अपडेट्स मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, ॲम्पियर कनेक्ट ॲपद्वारे रायडर्सना रिअल-टाइम चार्जिंग स्टेटस, लाइव्ह ट्रॅकिंग, थेफ्ट अलर्ट आणि बॅटरी हेल्थची माहिती मोबाईलवरच मिळेल.






