Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केटमध्ये आग लागणार! Tata Altroz नवीन अवतारात बाजारात; पाहा किंमत अन् फीचर्स…

अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी बाबत: १.२ लिटर रेवोट्रॉन आयसीएनजी इंजिनची शक्ती असलेली, अल्ट्रोज सीएनजी मोडमध्ये ७३.५ पीएस शक्ती आणि १०३ एनएम टॉर्क निर्माण करते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 05:41 PM
मार्केटमध्ये आग लागणार! Tata Altroz  नवीन अवतारात बाजारात; पाहा किंमत अन् फीचर्स…
Follow Us
Close
Follow Us:

टाटा मोटर्सने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात रचला इतिहास
देशातील पहिलीच प्रीमियम हॅचबॅक कार 
यामध्ये सीएनजी आणि ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगची  सोय 

मुंबई: टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लिमिटेड (टीएमपीव्‍ही) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज अल्‍ट्रोज आयसीएनजीमध्‍ये एएमटी तंत्रज्ञानाच्‍या सादरीकरणाची घोषणा केली, ज्‍यासह ही वेईकल सीएनजी पॉवरट्रेनसह ऑटो (एएमटी) ट्रान्‍समिशन असलेली भारतातील पहिली व एकमेव प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. ८.६९ लाख रूपये किंमत (Automobile) असलेली अल्‍ट्रोज आयसीएनजी एएमटी ब्रँडच्‍या ‘फिल स्‍पेशल’ तत्त्‍वाला अधिक दृढ करते, जेथे या वेईकलमध्‍ये सीएनजीची कार्यक्षमता व ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगची सोयीसुविधा एकत्र करण्‍यात आले आहेत, तसेच सेगमेंटमधील सर्वात सर्वसमावेशक मल्‍टी-पॉवरट्रेन लाइन-अप सादर करणे सुरू ठेवण्‍यात आले आहे.

टाटा अल्‍ट्रोज आयसीएनजी एएमटी मॉडेल विविध व्‍हेरिएण्‍ट्समध्ये उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार निवड करता येईल. या मालिकेतील ‘प्‍युअर’ या बेस व्‍हेरिएण्‍टची दिल्लीतील एक्‍स-शोरूम किंमत ८,६९,९९० रुपये आहे, तर ‘प्‍युअर एस’ व्‍हेरिएण्‍ट ८,९९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. मध्यम श्रेणीतील ‘क्रिएटिव्‍ह’ व्‍हेरिएण्‍टची किंमत ९,५९,९९० रुपये आणि ‘क्रिएटिव्‍ह एस’ व्‍हेरिएण्‍टची किंमत ९,८१,९९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या श्रेणीतील सर्वात प्रीमियम असा ‘अकॉम्‍प्‍लीश एस’ हा टॉप व्‍हेरिएण्‍ट १०,७६,९९० रुपयांना खरेदी करता येईल. या सर्व किमती दिल्लीतील एक्स-शोरूम दरांवर आधारित आहेत.

लाँचप्रसंगी मत व्‍यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले , “अल्ट्रोजने आपल्या डिझाइन, सुरक्षा आणि पॉवरट्रेनच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करून प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सातत्याने नवनवीन निकष प्रस्थापित केले आहेत. सीएनजी हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा इंधन पर्याय आहे. त्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २५ मध्ये १९ टक्‍के आणि आर्थिक वर्ष २६ मध्ये २२ टक्‍के राहिले आहे. ही वाढ आता फक्त पारंपारिक बाजारपेठांपुरती मर्यादित नसून नवीन प्रदेशांमधूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

आयसीएनजी लाइन-अपमध्ये एएमटी तंत्रज्ञान सादर करून आम्ही सीएनजी वेईकल्‍समध्‍ये अधिक सुविधेसाठी असलेल्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करत आहोत. या नवीन विस्तारामुळे अल्ट्रोज आपल्या सेगमेंटमधील सर्वात वैविध्‍यपूर्ण आणि प्रीमियम कार ठरली आहे, जी जागा किंवा सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता कार्यक्षमता, ड्रायव्हिंगमधील सहजता आणि दैनंदिन उपयुक्तता यांचा योग्य समतोल साधते.”

अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी बाबत: १.२ लिटर रेवोट्रॉन आयसीएनजी इंजिनची शक्ती असलेली, अल्ट्रोज सीएनजी मोडमध्ये ७३.५ पीएस शक्ती आणि १०३ एनएम टॉर्क निर्माण करते. आता प्रथमच याला एएमटीसह जोडण्यात आले आहे, ज्यामुळे विशेषतः शहरातील रहदारीमध्ये ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुखद आणि सोयीस्कर होतो. आयसीएनजी तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी प्रगत सिंगल ईसीयू आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये अत्यंत सहजपणे बदल करता येतो.

Electric Car : 683 किमी रेंज, 5-स्टार सेफ्टी अन् दमदार लूक; ‘ही’ इलेक्ट्रिक कार तब्बल 2 लाखांनी स्वस्त

सेगमेंटमधील पहिले डायरेक्ट स्टार्ट इन सीएनजी वैशिष्ट्य यातील सुविधा वाढवते आणि चढ-उतार किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान सातत्यपूर्ण कामगिरी सुनिश्चित करते. अल्ट्रोजमध्ये टीएमपीव्‍हीचे ट्विन-सिलेंडर आयसीएनजी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामध्ये सिलेंडर्स सामानाच्या जागेच्या खाली बसवले आहेत. यामुळे सीएनजी मोडमध्येही २१० लिटरची वापरण्यायोग्य बूट स्पेस मिळते, ज्यामुळे सीएनजी वेईकल्‍सबाबत असलेल्या जागेच्या कमतरतेची समस्या दूर होते, पेट्रोल आणि डिझेल व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ३४५ लिटर बूट स्पेस मिळते.

Web Title: Amt technology introduced in the tata altroz icng automobile marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • automobile news
  • CNG

संबंधित बातम्या

Electric Car : 683 किमी रेंज, 5-स्टार सेफ्टी अन् दमदार लूक; ‘ही’ इलेक्ट्रिक कार तब्बल 2 लाखांनी स्वस्त
1

Electric Car : 683 किमी रेंज, 5-स्टार सेफ्टी अन् दमदार लूक; ‘ही’ इलेक्ट्रिक कार तब्बल 2 लाखांनी स्वस्त

8 लाखांच्या बजेटमध्ये येणार Tata Kuno EV? दमदार रेंजसह Creta आणि Nexon ला देणार टक्कर
2

8 लाखांच्या बजेटमध्ये येणार Tata Kuno EV? दमदार रेंजसह Creta आणि Nexon ला देणार टक्कर

Car Care Tips : नायट्रोजन गॅसमुळे टायर खरंच थंड राहतात का? काय सांगते विज्ञान?
3

Car Care Tips : नायट्रोजन गॅसमुळे टायर खरंच थंड राहतात का? काय सांगते विज्ञान?

Honda ने लाँच केली नवीन NX500 बाईक; एक्स-शोरूम किंमत पोहोचली 7.44 लाखांवर
4

Honda ने लाँच केली नवीन NX500 बाईक; एक्स-शोरूम किंमत पोहोचली 7.44 लाखांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.