Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स (फोटो सौजन्य: X.com)
आशिया कप 2025 मधील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तानात खेळला गेला आणि नेहमीप्रमाणे भारत हा सामना मोठ्या दिमाखात जिंकला. या सामन्यात तिलक वर्माची खेळी निर्णायक ठरली. तसेच अभिषेक शर्माला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. मात्र, याही पेक्षा मोठी चर्चा रंगली ती त्याला मिळालेल्या HAVAL H9 बाबत.
Haval H9 ची सध्याची किंमत अंदाजे 1,42,199.8 सौदी रियाल आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 33.6 लाख रुपयांइतकी आहे. Haval H9 ही एक मोठी, 7-सीटर SUV आहे ज्यामध्ये पॉवरफुल इंजिन आहे. यात 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक ZF गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. त्यात सुधारित ऑफ-रोड क्षमतेसाठी 4WD ड्राइव्ह सिस्टम देखील आहे.
ही SUV डिझाईनमध्ये खूप प्रीमियम आहे. यात 14.6-इंच मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पॅनोरामिक सनरूफ आणि लक्झरी इंटिरियर मिळतो. याचा आकारही मोठा आहे, ज्याची लांबी 4950mm आणि रुंदी 1976mm आहे. Haval H9 एडव्हान्स्ड सेफ्टी फीचर्ससह तयार केली गेली आहे, त्यामुळे ही SUV प्रीमियम सेगमेंटमधील गाड्यांना थेट स्पर्धा देते.
Haval H9 मध्ये 6 एअरबॅग्स सोबत ब्लाइंट स्पॉट डिटेक्शन आणि अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल सारखे फीचर्स मिळतात. कारमध्ये 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स ड्रीव्हिंग अधिक सोपी करतात. ही कार 6 ड्राईव्ह मोड्स सोबत येते – ऑटो, इको, स्पोर्ट, सँड, स्नो, मड आणि 4L मोड्स. एक्सटिरिअर डिझाइन आकर्षक आणि कार्यक्षम आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, इलेक्ट्रिक साइडस्टेप्स, फॉग लॅम्प्स आणि मोठे 265/55 R19 टायर्स दिले आहेत.
‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स
या कारचे इंटिरिअरही अत्यंत शानदार आहे. यात मोठा 14.6 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, 10-स्पीकर साउंड सिस्टम दिला आहे. तसेच वायरलेस चार्जर, ड्रायव्हरसाठी खास डिझाईन केलेल्या लेदर मेमरी सीट्स आहेत, ज्या थंड आणि गरम दोन्ही व्हेंटिलेशनसह येतात.