फोेटो सौजन्य: Freepik
सणासुदीचा काळ चालू झाला आहे. या काळात अनेक जण आपल्या कुटुंबासाठी नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात. कोणी नवीन कपडे खरेदी करतं तर कोणी नवीन बाईक किंवा कार खरेदी करतात. त्यामुळेच अनेक ऑटो कंपनीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या कार्सवर विविध ऑफर्स जारी करत असतात. जर तुम्ही सुद्धा या काळात कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेऊया, कोणत्या कार्सवर किती सूट मिळत आहे.
हे देखील वाचा: 150 CC बाईक देईल दमदार मायलेज, फक्त चालवताना ‘अशाप्रकारे’ करा गिअर सेट
Hyundai Aura वर एकूण 48,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. जर तुम्ही कॉम्पॅक्ट सेडानच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही कार एक उत्तम पर्याय बानू शकतो. ही कार होंडा अमेझ आणि मारुती डिझायर सारख्या कार्सशी स्पर्धा करते. हे 1.2-लिटर इंजिनसह येते, जे पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालते.
Hyundai Verna वर एकूण 50,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. ही सेडान या सेगमेंटमधील सर्वात नवीन मॉडेल्सपैकी एक आहे. यासोबतच याला फ्युचरिस्टिक लुक आणि टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे. ADAS सारखे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. Hyundai Verna 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल किंवा 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते.
Honda Amaze वर एकूण 1.12 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. ही कार 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह येते आणि त्याचे इंजिन मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिकसह जोडलेले आहे. Honda Amaze मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचे नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस लाँच केले जाऊ शकते.
Honda City वर 1.14 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये सेडान कारवार कमाल सूट उपलब्ध आहे. हे व्हर्ना, व्हरटस आणि स्लाव्हिया सारख्या कार्सशी स्पर्धा करते. यामध्ये भरपूर फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची ती पहिली पसंती आहे.
Volkswagen Virtus वर 1.2 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. ही सेडान 1.0 किंवा 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह येते. यात एक आलिशान केबिन आहे, ज्यामध्ये उत्कृष्ट सुविधा देण्यात आल्या आहेत. या सेडानमध्ये ADAS दिलेली नाही.