दुसरे बाजीराव पेशवे यांचा जन्मदिवस ; जाणून घ्या १० जानेवारीचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज इ.स १८०२ ते १८१८ च्या दशकातील पेशवा दुसरे बाजीराव पेशवे यांचा जन्मदिवस आहे. मराठा साम्राज्याचा अंत याच काळात झाला. दुसरे बाजीराव हे रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचे पुत्र होते. १० जानेवारी १७७५ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. इतर बाजीरावांप्रमाणे त्यांनी लष्करी शिक्षण न घेतला भिक्षुकी शिक्षण घेतले होते. १८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजीरावांना राज्यकारभाराचे ज्ञान नसल्यामुळे मराठी साम्राज्याचा अंताला सुरुवाजत झाली होती. त्यांच्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे, चैनीसाठी शत्रूशी नुकसानकारक तह केले. ऐन युद्धाच्या काळात त्यांनी पळ काढला होता. यामुळे त्यांना पळपुटा बाजीराव असेही म्हटले जाते.
10 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
10 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
1775 : ‘बाजीराव पेशवे (दुसरे)’ – यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1851 – ब्रम्हावर्त)
1896 : ‘दिनकर गंगाधर केळकर’ – वास्तुसंग्राहक यांचा जन्म. (मृत्यू : 12 जानेवारी 1966)
1900 : ‘मारोतराव सांबशिव कन्नमवार’ – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 24 नोव्हेंबर 1963)
1901 : ‘डॉ. गणेश हरी खरे’ – इतिहास संशोधक यांचा जन्म.
1916 : ‘सुने बर्गस्ट्रोम’ – नोबेल पुरस्कार विजेते स्वीडिश बायोकेमिस्ट यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 2004)
1919 : ‘श्री. र. भिडे’ – संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक यांचा जन्म.
1930 : ‘बासु चटर्जी’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 4 जून 2020)
1934 : ‘लिओनिड क्रावचुक’ – युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 2022)
1937 : ‘मुरली देवरा’ भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 24 नोव्हेंबर 2014)
1940 : ‘के. जे. येसूदास’ – पार्श्वगायक व संगीतकार यांचा जन्म.
1945 : ‘जॉन मेसन’ – भारतीय शिक्षणतज्ञ यांचा जन्म (मृत्यू : 17 फेब्रुवारी 2023)
1950 : ‘नाजुबाई गावित’ – आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया यांचा जन्म.
1974 : ‘ऋतिक रोशन’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
10 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष
1760 : ‘रणवीर दत्ताजी शिंदे’ – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील यांचे निधन.
1778 : ‘कार्ल लिनिअस’ – स्वीडीश वनस्पतीतज्ञ यांचे निधन. (जन्म : 23 मे 1707)
1999 : ‘आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर’ – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत यांचे निधन.
2002 : ‘पं. चिंतामणी रघुनाथ व्यास’ – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1924)
2017 : ‘रोमन हर्झोग’ – जर्मनी देशाचे 7वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म : 5 एप्रिल 1934)
1997 : ‘अलेक्झांडर आर. टॉड’ – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश बायोकेमिस्ट (जन्म : 2 ऑक्टोबर 1907)
1994 : ‘गिरिजाकुमार माथूर’ – हिंदी कवी (जन्म : 22 ऑगस्ट 1919)
1957 : ‘गॅब्रिएला मिस्त्राल’ – चिलीचे कवी आणि शिक्षणतज्ज्ञ – नोबेल पुरस्कार (जन्म : 7 एप्रिल 1889)
तेलावरुन पेटले आंतरराष्ट्रीय राजकारण! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केले निकोलस मादुरो यांचे अपहरण






