फोटो सौजन्य: Freepik
आपली स्वतःची बाईक विकत घेणे हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होते तेव्हा आपला आनंद गगनात मावत नसतो. परंतु जशी जशी बाईक जुनी होऊ लागते तेव्हा समजते की बाईक घेणे सोपे आहे परंतु तिला सांभाळणे कठीण आहे.
बाईक जुनी होऊ लागली की अनेक जण तिचे मायलेज कशाप्रकारे वाढवता येईल याबद्दल माहिती काढताना दिसतात. जर तुमच्या बाईकचे इंजिन 150 सीसी आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बाईक चालवताना गिअरची महत्वाची भूमिका असते. अशावेळी तुम्हाला योग्यरित्या गिअर सेट करता आले पाहिजे. चला जाणून घेऊया काही अशा टिप्सबद्दल ज्यामुळे तुमच्या बाईकचे मायलेज वाढेल.
हे देखील वाचा: कुटुंबासोबत Long Trip वर जायचा प्लॅन बनवत आहात? ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष
कमी स्पीडमध्ये हाय गिअर टाळा: जर तुम्ही कमी स्पीडमध्ये हाय गिअरवर बाईक चालवत असाल तर यामुळे इंजिनवर जास्त दबाव येतो आणि इंधनाचा वापर वाढतो. उदाहरणार्थ, जर तुमच्या बाईकचा स्पीड 20-30 किमी/ताशी वेगात असेल बाईक 3ऱ्या गिअरमध्ये ठेवा आणि 40-50 किमी/ताशी वेगात 4थ्या किंवा 5व्या गिअरवर बाईक शिफ्ट करा.
बाईक जास्त वेगाने चालवण्याऐवजी हळूहळू तिचा वेग वाढवा. अचानक वेगवान एक्सेलरेशन अधिक इंधन वापरतो, तर स्थिर आणि हळूवार गतीने वेग वाढल्याने इंधनाची बचत होते.
नेहमी इंजिनला त्याच्या इष्टतम RPM (रिव्होल्यूशन्स पर मिनिट) वर चालवण्याचा प्रयत्न करा. बाईकवरील गीअर्स बदलताना इंजिनच्या आवाजाकडे लक्ष द्या; जर इंजिन खूप आवाज करत असेल तर गीअर कमी करा आणि इंजिन कमकुवत वाटत असेल तर गियर वाढवा.
वेळोवेळी इंजिन ऑइल बदला आणि एअर फिल्टर स्वच्छ ठेवा. गलिच्छ एअर फिल्टर योग्य प्रमाणात हवा इंजिनमध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो. याशिवाय टायरचा दाब योग्य ठेवल्याने मायलेजही सुधारते.
विनाकारण ब्रेक लावणे टाळा. अचानक ब्रेकिंग आणि ऍक्सिलरेशन या दोन्ही गोष्टींमुळे इंधनाचा वापर वाढतो. तसेच रहदारीमध्ये बाईकला स्थिर वेगात ठेवण्याचा प्रयत्न करा.
एकाच गियरमध्ये जास्त वेळ बाईक चालवल्याने इंधनाचा वापर वाढू शकतो. त्यामुळे गतीनुसार वेळोवेळी गिअर बदलत चला. रहदारीत कमी गिअर आणि मोकळ्या रस्त्यावर जास्त गिअर वापरा.