फोटो सौजन्य: Social Media
देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक असण्यासोबतच कमी खर्चिक असतात.
नवीन वर्षात अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेक ग्राहकांच्या खिशाला जास्त कात्री लागणार आहे. याव्यतिरिक्त आता इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी, एथर सुद्धा त्यांच्या स्कूटरची किंमत वाढवणार आहे.
2025 उजाडले नाही तेच Bajaj च्या ‘या’ 3 बाईक्सने मार्केटला केले राम राम
Ather ने इलेक्ट्रिक स्कूटरची 450 रेंजला अपडेट केले आहे. स्कूटरमध्ये नवीन फीचर्स जोडण्याबरोबरच, एथरने या ईव्हीच्या रेंजमध्येही सुधारणा केली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अपडेट झाल्यानंतर ईव्हीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. Ather 450S ची किंमत 1.30 लाख रुपयांपासून सुरू होते. तर मिड व्हेरियंट 450X 2.9 ची किंमत 1.47 लाख रुपये आणि 450X 3.7 ची किंमत 1.57 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
Ather 450S ची किंमत 4,400 रुपयांनी वाढली आहे. या स्कूटरमध्ये थोडा वेगवान चार्जिंग 375W चार्जर उपलब्ध आहे. मागील मॉडेलमध्ये, 350W युनिट चार्जर उपलब्ध होते. एथर ई-स्कूटरमधील प्रो पॅकमध्ये अनेक फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
Ather 450X च्या दोन्ही व्हेरियंटमध्ये मॅजिक ट्विस्ट आणि ट्रॅक्शन कंट्रोलचे फीचर्स उपलब्ध आहेत. यासोबतच या EV मध्ये दोन नवीन कलर ऑप्शन्स देखील जोडण्यात आले आहेत. Ather 450X 2.9 ची किंमत सर्वाधिक वाढली आहे. या ईव्हीच्या किंमतीत 6,400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पण Ather ची ही स्कूटर आता 700 kW चा चार्जर उपलब्ध आहे ज्यामुळे स्कूटरचा चार्जिंग टाइम अर्धा होईल.
जुनी किंमत विसरा ! आता Citroen Basalt खरेदी करणे झाले अजूनच महाग, कंपनीने ‘इतकी’ वाढवली किंमत
Ather 450X 3.7 ची किंमत दोन हजार रुपयांनी वाढली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नवीन फीचर्स आणि कलर व्हेरियंटचाही समावेश केला जाऊ शकतो. या EV मध्ये मॅजिक ट्विस्टचे दोन लेव्हल उपलब्ध आहेत – low आणि High. तर 450X 2.9 मध्ये फक्त ते ऑन किंवा ऑफ केले जाऊ शकते.
एथर 450 हायपर सँड कलर व्हेरियंटसोबत आला आहे. तेच Ather 450S ला हायपर सँडसोबत स्टील ब्लू कलर देखील देण्यात आला आहे. एथरच्या या स्कूटर्सना बाजारात मोठी मागणी आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.07 लाख रुपयांपासून सुरू होते. एथर 450 च्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल बोलायचे झाले तर TVS iQube या इलेक्टिक स्कूटर चांगलीच टक्कर देत आहे.