दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव (Photo Credit- X)
कापसाड गावातील रहिवासी सुनीता आणि त्यांची मुलगी गुरुवारी सकाळी घरी परतत असताना, गावातीलच पारस राजपूत नावाच्या तरुणाने त्यांना अडवले. मृत सुनीता यांचे पती सतेंद्र यांच्या माहितीनुसार, पारसने त्यांच्या मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. जेव्हा सुनीता यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रतिकार केला, तेव्हा संतापलेल्या पारसने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनीता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, संधी मिळताच पारसने त्यांच्या मुलीला जबरदस्तीने पळवून नेले.
या घटनेनंतर दलित समाज आक्रमक झाला असून, गेल्या ३० तासांपासून सुनीता यांचा मृतदेह गावातच ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत पोलीस मुलीला सुरक्षित परत आणत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबाने घेतली आहे. संतप्त जमावाने मृतदेह घेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेची तोडफोड केली असून, शवविच्छेदन करण्यासही विरोध दर्शवला आहे.
Suicide News: कोर्ट परिसरात धक्कादायक घटना! तरुणांने उडी मारून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा
दुसरीकडे, आरोपी पारस राजपूतच्या कुटुंबाने वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पारस आणि त्या मुलीचे प्रेमसंबंध होते आणि मुलीनेच त्याला फोन करून बोलावले होते. वादावादी दरम्यान मुलीनेच तिच्या आईवर कुऱ्हाडीने वार केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, पोलीस सर्व कोनातून तपास करत असून, सध्यातरी हत्येच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ‘बांगड्या’ फेकून पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा निषेध केला. भीम आर्मीचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी पीडित कुटुंबाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि “पोलिसांची गुंडगिरी खपवून घेणार नाही” असा सज्जड दम प्रशासनाला दिला. सरधनाचे आमदार अतुल प्रधान यांना पोलिसांनी गावात प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी गावाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.
एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की, मुलीची सुरक्षित सुटका करणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. “आम्ही १० पोलीस पथके तैनात केली असून आरोपीच्या शोधासाठी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. लवकरच मुलीचा शोध लागेल,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके






