म्हस्के म्हणाले की, सिडको ट्रान्स्फर चार्जेसचा मुद्दा इतके वर्ष नवी मुंबईत राहून त्यांना सोडविता आला नाही. प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा सोडविता आला नाही. 30 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे असे ते म्हणतात मग, पार्किंगचे नियोजन त्यांना का करता आले नाही? असा सवाल म्हस्केंनी विचारला.
कंपन्यांकडून जिझिया कर व हडपलेले भुखंड
नवी मुंबई एमआयडीसीतील कंपन्या गुजरातला का जात आहेत? याचे उत्तर जनतेने शोधावे. Ya कंपन्यांमधून जिझिया कर कोण घेते? बावखळेश्वर मंदिराची जमीन कोणी हडपली ? ग्लास हाऊस कोणत्या भूखंडावर उभे केले होते? कोणी हडपलेली ती जमीन ? अडवली भुतवली 350 एकर वनविभागाची जमीन रेसिडेनशियल केली. एकनाथ शिंदेंनी ती पुन्हा फॉरेस्टमध्ये टाकली. आपण दुसऱ्याला चोर म्हणायचे आणि स्वतः मात्र भूखंडांची दरोडेखारी करायची असा टोला खासदार म्हस्के यांनी नाईकांचे नाव न घेता लगावला.
पुनर्विकासाला विरोध का?
नवी मुंबईत आता शहरात कुटुंबे वाढली आहेत. त्यांना मोठे घर हवे आहे. इमारती धोकादायक बनल्या आहेत. ही मंडळी सामान्य आहेत. त्यांना मोठे घर घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ते पुनर्विकासाकडे डोळे लावून बसले आहेत. पुनर्विकासाला चालना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याचे म्हस्के म्हणाले.
अमेरिकेला लिहिलेल्या मोदीं विरोधातील पत्रात संजीव नाईकांची सही
2012 साली खासदारही अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षांनी पत्र लिहिले होते. त्यात त्यांच्यावर विविध गंभीर आरोप केले होते. त्यावेळी खासदारांनी ज्या सह्या केल्या होत्या. त्यात संजीव नाईक यांची देखील सही होती. मोदींबद्दल आकस असणाऱ्यांनी आता भाजपाचे कातडं पांघरले आहे. इथले संघाचे लोक होते. त्यांची तिकिटे कापली गेली. स्वतःची स्तुती करणारे लोक हवेत. त्यांना मलिदा आणून देणारे हवेत. नाईक विरुद्ध संघ व भाजपा असे चित्र सध्या नवी मुंबईत आहे.
प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे एकनाथ शिंदेंनी सोडवले
इतकी वर्ष ही नेते सत्तेत होते. पालिकेपासून ते दिल्लीपर्यंत हे सत्तेत होते. मात्र यांना नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडविता आला नाही. कारण आम्ही पाठपुरावर करत आहोत असे सांगितले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विषय समजून घेत, अध्यादेश काढला. प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिंदे साहेब नुसते आश्वासन देत बसले नाहीत असा घणाघात जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी केला.
यांच्या अहंकारामुळे नवी मुंबईचे नुकसान
शिवसेनेत असताना यांचे बाळासाहेबांसोबात मतभेद होतें काँग्रेसमध्ये असताना, विलासराव देशमुख व, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत भांडण होते. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत वाद तयार करत आहेत. यांच्या अहंकारामुळे नवी मुंबईचे नुकसान झाले आहे. मानखुर्द पर्यंत मेट्रो पोहोचली मात्र ती नवी मुंबईत येऊ शकली नाही. डिपी प्लॅनमध्ये मेट्रो टाकली गेली नाही. सर्वाधिक जास्त अनधिकृत बांधकाम त्यांचा माजी आ. संदीप नाईक आमदार असताना ऐरोलीत झाले.बोनकोडे गाव यांना सुधारता आले नाही असा टोला जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी गणेश नाईक यांना लगावला.
एफडी मोडून जनतेची कामे झाली
पालिकेची एफडी ठाणेकरांनी मोडली या गणेश नाईकांच्या आरोपांना यावेळी म्हस्केंनी उतर दिले.ते म्हणाले की एफडी मोडली म्हणजे काय केले? ते पैसे जनतेसाठी जनतेच्या गरजांसाठी वापरले. त्यातून कोणाची घरे नाही भरली. गरज पडल्यावरच एफडी मोडायच्या असतात, त्यासाठीच त्या ठेवलेल्या असतात अस म्हस्के म्हणाले.
धरणाचे क्रेडिट नाईकांचे कसे ?
म्हस्के म्हणाले की, गणेश नाईक आरोप करतात की प्रशासकाच्या अडून निर्णय घेतले गेले. तिजोरी लुटली गेली. ते म्हणतात की पाण्याच्या नियोजनासाठी पोशिर धरणाचा निर्णय आम्ही घेतला. जर प्रशासन आम्ही चालवत असू, तर मग ते पोशिर धरणाचे क्रेडिट शिंदेंना जाते. नगरविकास खात्याशी तुमचा संबंध काय? हा निर्णय नगरविकास खाते घेते. वाईट झाले की शिंदेंनी केले. चांगले झाले तर मी केले ही भूमिका यांची आहे. हे बिबट्या आल्यावर शेळ्या सोडायला सांगतात असे यांचे व्हिजन असल्याचा टोला त्यांनी लगावला.
विक्रांत पाटलांचा नाईकांच्या प्रस्तावाला मूक विरोध ?
भाजपा व शिंदे सेनेत युतीसाठी बैठका सुरू होत्या. त्या दरम्यान भाजपाने अवघ्या २० जागा शिवसेनेला देऊ केल्या होत्या. त्यावर म्हस्के यांनी अंडर की बात पत्रकारांसमोर शुक्रवारी उघड केली. म्हस्के म्हणाले की, त्यांनी आम्हाला 20 जागा देऊ केल्या. मी विधानपरिषदेचे भाजपचे आ. विक्रांत पाटील यांना सांगितले की, हा प्रस्ताव तुम्हाला स्वतःला मान्य असेल तर आम्ही सही करतो. मात्र त्यांनी त्यावर सही केली नाही. त्यामुळे आता विक्रांत पाटील यांना देखील नाईकांनी दिलेला प्रस्ताव मान्य नव्हता का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
पुनर्विकासात टक्केवारी
यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी नाईकांच्या पुत्रावर गंभीर आरोप केले. नाईक पुनर्विकासवरून एकनाथ शिंदेंवर प्रहार करत आहेत. मात्र यांचे चिरंजीव प्रत्येक पुनर्विकासाच्या प्रकल्पात जाऊन टक्केवारी घेत असतात असा आरोप नाहटा यांनी केला. ठाण्यात युतीच्या बाबतीत मिठाचा खडा त्यांनी टाकल्याने त्यांच्याकडून ठाण्याची जबाबदारी काढून घेण्यात आल्याचा खुलासा नाहटा यांनी केला.






