मुंबई : ऑडी (Audi) या जर्मन लक्झरी कार (German Luxury Car) उत्पादक कंपनीने आज भारतात ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) व ‘मायऑडी कनेक्ट’ ॲपवर (My Audi Connect) नवीन ऑडी क्यू३ (New Audi Q3) साठी ऑनलाइन बुकिंग्जना (Online Bookings) सुरूवात केली. नवीन ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लस व टेक्नोलॉजी (Premium Plus And Technology) या दोन व्हेरिएण्ट्समध्ये (Two Varients) उपलब्ध असेल आणि सेगमेंट-फर्स्ट असलेल्या अनेक वैशिष्ट्यांसह येईल.
नवीन ऑडी क्यू३ (New Audi Q3) २,००,००० रूपये या सुरूवातीच्या रक्कमेसह बुक करता येऊ शकते. पहिल्या ५०० ग्राहकांना एक्सटेण्डेड वॉरंटी व कम्प्रेहेन्सिव्ह सर्विस पॅकेजसह आकर्षक मालकीहक्क लाभ मिळतील ज्यात २+३ वर्षांची एक्सटेण्डेड वॉरंटी, ३ वर्षे / ५०,००० किमी कम्प्रेहेन्सिव्ह सर्विस व्हॅल्यू पॅकेज, विद्यमान ऑडी ग्राहकांसाठी स्पेशल लॉयल्टी लाभ यांचा समावेश आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “नवीन ऑडी क्यू३ (New Audi Q3) चे भारतात फॅन फॉलोअर्स आहेत आणि सर्वांच्या आवडीची आहे. हे आमचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल राहिले आहे आणि आम्हाला सर्व आकर्षक वैशिष्ट्ये व मालकीहक्क लाभांच्या घोषणेसोबत बुकिंग्जना सुरूवात करण्याचा आनंद होत आहे. नवीन ऑडी क्यू३ सह आम्ही या वेईकलचे नवीन लुक व दर्जात्मक वैशिष्ट्यांसह सर्वोत्तम तत्त्व सादर करत आहोत.”
नवीन ऑडी क्यू३ (New Audi Q3) नवीन क्षमतांसह यशस्वी मॉडेल आहे. उत्तम सर्वांगीण क्षमतांनी युक्त कार असलेल्या नवीन ऑडी क्यू३ मध्ये प्रमाणित म्हणून क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आहे आणि २.० लिटर टीएफएसआय इंजिन आहे, जे १९० एचपी शक्ती व ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. ही कार फक्त ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते.
[read_also content=”ऑडीकडून भारतात नवीन ऑडी ए८ एल लाँच https://www.navarashtra.com/automobile/audi-launches-new-audi-a8l-in-india-303897.html”]
› ४५.७२ सेमी (आर१८) ५-आर्म स्टाइल अलॉई व्हील्स
› क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह
› एलईडी हेडलॅम्प्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स
› पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ
› उच्च ग्लॉस स्टायलिंग पॅकेज
› पॉवर ॲडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह ४-वे लम्बर सपोर्ट
› लेदर-लेदरेट कॉम्बीनेशनमध्ये सीट अपहोल्स्टरी
› रिअल सीट प्लससह फोअर/ॲफ्ट अडजस्टमेंट
› लेदरमध्ये रॅप केलेले ३-स्पोक मल्टीफंक्शन प्लस स्टिअरिंग व्हीलसह पॅडल शिफ्टर्स
› सिल्व्हर ॲल्युमिनिअम डायमेन्शनमध्ये डेकोरेटिव्ह इन्सर्टस
› ॲम्बियण्ट लायटिंग पॅकेज (सिंगल कलर)
› पुढील बाजूस स्कफ प्लेट्ससह ॲल्युमिनिअम इन्सर्टस
› स्टोरेज व लगेज कम्पार्टमेंट पॅकेज
› कम्फर्ट सस्पेंशन
› हिल स्टार्ट असिस्ट
› फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर व्ह्यू मिरर
› २-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टिम
› स्टार्ट/स्टॉप सिस्टिमसह रिजनरेटिव्ह ब्रेकिंग
› पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा
› क्रूझ कंट्रोल सिस्टिमसह स्पीड लिमिटर
› एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर ॲडजस्टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्ही बाजूस ऑटो-डिमिंग
› डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर
› ब्ल्यूटूथ इंटरफेस
› ऑडी स्मार्टफोन इंटरफेस
› इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टिअरिंग
› ६ एअरबॅग्ज
› टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम
› इसोफिक्स चाइल्ड सीट अँकर्स आणि बाहेरील रिअर सीट्ससाठी टॉप टेथर
› ऑडी-थेफ्ट व्हील बोल्ट्स
› स्पेस-सेव्हिंग स्पेअर व्हील
[read_also content=”VIDEO : ऑडी इंडियाद्वारे २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ४९ टक्क्यांची वाढ https://www.navarashtra.com/photos/49-percent-growth-audi-india-reports-in-first-half-of-2022-nrvb-300399.html”]
› ॲल्युमिनिअल लुकमधील इंटीरिअर (मिरर ॲडजस्टमेंट स्विचवरील एलीमेण्ट्स, पॉवर विंडो स्विचेस, पार्किंग ब्रेक कंट्रोल बटन आणि ॲल्युमिनिअम लुकमधील डोअर स्ट्रिप्स)
› एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच
› ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट
› ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस
› ॲम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस (३० रंग)
› कम्फर्ट कीसह गेस्चर-नियंत्रित टेलगेट
› लगेज कम्पार्टमेंट लिड, जे इलेक्ट्रिकली उघडते व बंद होते
› ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग सिस्टिम
› ऑडी साऊंड सिस्टिम (१२० स्पीकर्स, १८० वॅट)