फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये जसे बाईक्सना मोठी मागणी असते. तशीच मागणी विदेशात सुद्धा असते. याच वाढत्या मागणीकडे एक संधी म्हणून पाहत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या विविध सेगमेंटमधील बाईक्स लाँच करत असतात. एरवी आपण नेहमीच ऐकत असतो की विदेशी कंपन्यांच्या बाईक्सला भारतीय मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. मात्र, आज आपण एका भारतीय कंपनीबद्दल जाणून घेऊयात ज्यांच्या बाईक्सने विदेशी लोकांना भुरळ घातली आहे. ही कंपनी म्हणजे Bajaj Auto.
बजाज ऑटोने मे 2025 चा सेल्स रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे आणि दुचाकींच्या विक्रीत वार्षिक (YOY) 9% ची चांगली वाढ दिसून आली आहे. यावेळी कंपनीने एकूण 3,32,370 युनिट्स विकल्या. हीच संख्या मे 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 3,05,482 युनिट्सपेक्षा जास्त आहे. चला कंपनीच्या सेल्स रिपोर्टवर एक नजर टाकूया.
केवळ देशांतर्गतच नाही तर बजाजचे एक्स्पोर्ट परफॉर्मन्स देखील उत्कृष्ट राहिले आहे. मे 2024 मध्ये कंपनीने 1,17,142 युनिट्सची निर्यात केली, तर मे 2025 मध्ये हा आकडा 20% वाढून 1,40,958 युनिट्स झाला होता.
मागील महिन्याच्या तुलनेत बजाजने देशांतर्गत बाजारातही थोडीशी सुधारणा केली आहे. एप्रिल 2025 मध्ये 1,38,476 युनिट्सची विक्री झाली, तर मे मध्ये विक्री 2% वाढून 1,40,958 युनिट्स झाली.
कंपनीने दोन महिन्यांच्या (Year-To-Date) एकूण आकडेवारीत संमिश्र कामगिरी केली. यादरम्यान कंपनीच्या निर्यातीत 12% वाढ झाली. एप्रिल-मे 2025 मध्ये बजाजने 2,70,280 युनिट्सची निर्यात केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 2,41,981 युनिट्सपेक्षा जास्त आहे.
एप्रिल-मे 2024 मध्ये 4,05,290 युनिट्स विकले गेले, तर 2025 मध्ये ही विक्री 3,80,027 युनिट्सपर्यंत घसरली आहे.
TVS कडून 450cc इंजिन असणाऱ्या बाईकवर काम सुरु, केव्हा होईल लाँच?
बजाज ऑटोचा FY25 (एप्रिल 2024 ते मार्च 2025) च्या संपूर्ण रिपोर्टमध्ये असा होता. देशांतर्गत विक्रीत 3% वाढ झाली. FY 24 मध्ये कंपनीने 22,50,585 युनिट्स विकल्या गेल्या, जी आर्थिक वर्ष 2025 मध्ये 23,08,249 युनिट्सपर्यंत वाढली. निर्यात 13% वाढली. आर्थिक वर्ष 24 मध्ये 14,77,338 युनिट्स निर्यात करण्यात आल्या, जे FY 25 मध्ये 16,74,060 युनिट्सपर्यंत वाढली.
देशांतर्गत विक्रीत कंपनीची 3% ची सौम्य वाढ दिसून आली. निर्यातीत 20% ची जोरदार वाढ दिसून आली. परंतु, देशांतर्गत विक्रीतही वार्षिक आधारावर 7% ची घट झाली आहे. या कालावधीत एकूण 4,42,467 युनिट्स निर्यात करण्यात आल्या आणि 5,01,096 युनिट्स देशांतर्गत बाजारात विकल्या गेल्या.
बजाजने FY 25 मध्ये एकूण 39,82,309 दुचाकी विकल्या, त्यापैकी जवळपास 11 लाख युनिट्स केवळ चौथ्या तिमाहीत (Q4) विकल्या गेल्या. बजाज ऑटोने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की ते केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही एक मजबूत ऑटो कंपनी आहे.