फोटो सौजन्य: @autocarindiamag (X.com)
भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. देशात विविध सेगमेंटमध्ये बाईक विकल्या जातात, ज्यांना मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे. हीच वाढती मागणी लक्षात घेत, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या ग्राहकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर करत आहे. यातीलच एक आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी म्हणजे TVS.
भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. कंपनी पूर्णपणे नवीन 450 सीसी बाईक बनवणार आहे. कंपनीने त्याचे प्लॅटफॉर्म बनवण्याचे कामही सुरू केले आहे. हे प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी कंपनीने BMW आणि Norton मोटरसायकल कंपनीसोबत शेअर केले आहे. जर असे झाले तर लाइनअपमध्ये एक नवीन इंजिन बाईक समाविष्ट केली जाईल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टीव्हीएस मोटरच्या नवीन बाईकचे इंजिन प्लॅटफॉर्म 450 सीसी पॅरलल-ट्विन इंजिन असेल. हे इंजिन पहिल्यांदा EICMA 2024 मध्ये BMW F 450 GS कॉन्सेप्ट बाईकमध्ये दिसले होते. याबद्दल टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले की, हे तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्म शेअरिंग टीव्हीएस, बीएमडब्ल्यू आणि नॉर्टन यांच्यात सुरू राहील.
टीव्हीएस मोटर त्यांच्या नवीन 450 सीसी बाईकचे इंजिन भारतात बनवू शकते, जर टीव्हीएसने असे केले तर ते मेक इन इंडिया उपक्रमासाठी आणखी एक उपलब्धी असेल. यामुळे संपूर्ण जगाला संदेश जाईल की भारत प्रगत मोटरसायकल तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर एक केंद्र बनत चालले आहे. त्याच वेळी, जर हे इंजिन भारतात बनवले गेले तर त्याची किंमत इतर 450 सीसी बाईकपेक्षा कमी असू शकते.
टीव्हीएस मोटरच्या नवीन 450 सीसी प्लॅटफॉर्मसह येणारी ही बाईक या वर्षाच्या अखेरीस ग्लोबल लेव्हलवर लाँच केली जाईल. हे इंजिनBMW F 450 GS मध्ये दिसेल, जे त्याच्या प्रोडक्शन मॉडेलला चालना देईल. याशिवाय, टीव्हीएस या वर्षाच्या अखेरीस भारतीय मार्केटमध्ये नॉर्टन सादर करणार आहे. सुरुवातीला, Norton V4SV मॉडेल भारतात लाँच केले जाईल. यासोबतच, नॉर्टन बाईक युनायटेड किंग्डम (यूके) आणि युरोपमधील काही इतर देशांमध्ये देखील विकल्या जातील.