फोटो सौजन्य: YouTube
आपल्याकडे नेहमीच दुचाकी आणि तिचे नवनवे फीचर्स या विषयांवर चर्चा आली आहे. विशेषतः तरुणाई या अशा चर्चांमध्ये स्वतःहून सहभागी होत असते. नॉर्मल बाइक्सपासून ते स्पोर्ट्स बाइक्सपर्यंत सर्वेच गाड्या सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. यात ई-बाईक भारतात धुमाकूळ घालत असतानाच लवकरच आता भारतात CNG बाईक लाँच होणार आहे.
बजाज ऑटो 5 जुलै 2024 रोजी भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जगातील पहिली CNG मोटरसायकल लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या कंपनीने आपल्या आगामी CNG बाइक देशात लाँच करण्यापूर्वी एक नवीन टीझर प्रदर्शित केला आहे.
या आगामी CNG बाइकमध्ये ADV प्रेरित डिझाइन आहे जे दुचाकी प्रेमींना आकर्षित करते. प्रीमियम 125cc मोटरसायकल ऑफर करून विविध गटातील लोकांना आकर्षित करू पाहणे हे बजाजचे उद्दिष्ट आहे. या बाईकमध्ये ५ लीटर पेट्रोल ठेवण्यास सक्षम असलेली एक लहान इंधन टाकी आहे. तसेच बाईकच्या व्हीलबेसवर एक लांब सीट आहे, ज्याखाली CNG टाकी ठेवली आहे.
बजाज सीएनजी बाईकमध्ये चांदीच्या रंगात हाइलाइट केलेले मस्क्युलर टँक देखील पाहायला मिळते, जे हेडलाइट हाउसिंगपर्यंत विस्तारले आहे. या बाइकमधील गोल हेडलाईट या गाडीला एक क्लासिक टच देते. तसेच हँडलबार ब्रेसेस, नकल गार्ड आणि फ्रंट डिस्क ब्रेक सेगमेंटमध्ये ही बाईक एक प्रीमियम फील देते.
या CNG बाईक मध्ये अनेक फीचर्स आहेत, जसे की साइड बॉडी पॅनल, स्टायलिश बेली पॅन, स्प्लिट 5-स्पोक डिझाइन अलॉय व्हील्स, मागील प्रवाशांसाठी फंक्शनल ग्रॅब रेल, रिब्ड सीट, ट्रेडिशनल RSU टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील मोनो-शॉक सेटअप, टायर हगर आणि मेगा कलर यांचा समावेश आहे.
बजाज सीएनजी बाईकमध्ये 125 सीसी इंजिन दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीच्या कमी कार्यक्षमता लक्षात घेता, ही बाईक 100 सीसी इंजिनच्या जवळ परफॉर्म करू शकते. तसेच, यामध्ये चांगले मायलेज आणि कमी रनिंग कॉस्ट पाहायला मिळू शकते.