Makhana Smoothie Recipe : ही पौष्टिक मखाना स्मूदी चव आणि आरोग्य यांचा सुंदर मेळ साधणारी असून, वजन कमी करण्यासाठी आहारात हिचा समावेश खूप फायद्याचा ठरतो. चला घरच्या घरी मखाना स्मूदी कशी बनवायची ते जाणून घ्या.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मखाना हा हा कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.
वजन कमी करण्यासाठी याचे सेवन खूप फायद्याचे ठरते.
अनेकांना ठाऊक नाही पण तुम्ही मखान्यांची क्रिमी स्मूदी घरच्या घरी तयार करू शकता.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीराला आवश्यक पोषण देणारे, पटकन तयार होणारे आणि चविष्ट असे पदार्थ निवडणे गरजेचे झाले आहे. अशाच आरोग्यदायी पर्यायांपैकी एक म्हणजे मखाना स्मूदी. मखाना हा हलका, पचायला सोपा आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा घटक आहे. उपवासात किंवा रोजच्या आहारातही तो सहजपणे समाविष्ट करता येतो. फळे, ड्रायफ्रूट्स आणि दुधासोबत मखान्याची जोड दिल्यास तयार होणारी ही स्मूदी केवळ चवदारच नाही तर शरीराला ऊर्जा देणारी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, व्यायामानंतर किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग याची सोपी रेसिपीजाणून घेऊया.
मखाना हा पोषक तत्वांचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न आणि झिंक यांसारखे अनेक आवश्यक घटक आढळतात. कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.
हाडांच्या आरोग्यासाठी मखाना विशेष फायदेशीर आहे. त्यातील कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक शरीरातील हाडांच्या चयापचय प्रक्रियेला संतुलित ठेवण्यास सहाय्य करतात.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही मखान्याचा आहारात समावेश उपयुक्त ठरतो. नियमित प्रमाणात सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ तृप्तीची भावना राहते.
Web Title: Make healthy makhana smoothie at home best for weight loss recipe in marathi