(फोटो सौजन्य-AI एआय)
या बाईकमधील सर्वात महत्त्वाचा भाग तिचे इंजिन असेल. रिपोर्ट्सनुसार, यात 249cc एअर किंवा ऑइल-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन मिळू शकते. हे इंजिन पल्सर N250 मधील मोटरशी संबंधित असण्याची शक्यता आहे. पल्सर N250 मध्ये हे इंजिन 24.2 bhp पॉवर आणि 21.5 Nm टॉर्क देते. पण अॅडव्हेंचर बाईकसाठी बजाज इंजिनचे ट्युनिंग बदलून लो आणि मिड-रेंज टॉर्कला जास्त महत्त्व देऊ शकते.
टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या बाईकमध्ये उंच फ्रंट एंड, स्लिम बॉडी, बीक-स्टाइल फ्रंट मडगार्ड, सरळ हँडलबार आणि लांब सिंगल-पीस सीट दिसली आहे. उंचावर बसवलेला एक्झॉस्ट, स्पोक व्हील्स आणि ड्युअल-पर्पज टायर्स यामुळे बाईकला ऑफ-रोड लूक मिळतो. 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर व्हील्स दिले जाण्याची शक्यता आहे. पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे लिंक्ड मोनोशॉक मिळू शकतो.
टेक्नोलॉजीच्या बाबतीतही ही बाईक साधी नसेल. टेस्ट म्यूल्समध्ये फुल-कलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिसला आहे. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, राइड मोड्स, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि ABSशी संबंधित फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. पण बजाजने या फीचर्सची ऑफीशली पुष्टी केलेली नाही.
बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार
या बाईकच्या नावाबाबतही उत्सुकता आहे. बजाजने भारतात ‘Trekker’ नाव ट्रेडमार्क केल्यामुळे हे नाव नव्या अॅडव्हेंचर बाईकसाठी वापरले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तिचे ग्लोबल डेब्यू नोव्हेंबर-डिसेंबर 2026 दरम्यान होण्याची शक्यता असून, भारतातही त्याच काळात किंवा त्यानंतर लाँच होऊ शकते. अंदाजे किंमत ₹1.5 लाख ते ₹1.8 लाख असू शकते, पण किंमतीची ऑफीशली घोषणा झालेली नाही.






