फोटो सौजन्य: iStock
2024 मध्ये अनेक दमदार बाईक्स लाँच झाल्या, यातील काही ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या तर काही आल्या तशा गेल्या. अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी आपल्या बाईक्ससोबत अनेक नवीन फीचर्स देखील समाविष्ट केले आहे. या वर्षी बजेट फ्रेंडली बाईक्स सोबतच महागड्या किंमतीच्या बाईक सुद्धा लाँच झाल्या आहेत.
2024 मध्ये भारतीय बाईकच्या बाजारात काही नवीन आणि मनोरंजक मॉडेल्स दिसणार आहेत. या बाईक्स प्रत्येक रायडरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. यंदाच्या वर्षी प्रत्येकासाठीच उत्तम बाईक्स लाँच झाल्या आहेत. चला जाणून घेऊया, या वर्षी अशा कोणत्या बेस्ट बाईक्स लाँच झाल्या आहेत.
Pulsar N 125 ला 124cc एअर-कूल्ड इंजिनसह पुन्हा डिझाइन केले आहे. यामध्ये बसवलेले इंजिन १२ बीएचपी पॉवर आणि ११ एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यामध्ये डिजिटल डॅश आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या बाइकची किंमत 93,900 रुपये आहे.
Year Ender 2024: या कार्सनी 2024 मध्ये भारताला ठोकला राम राम, जाणून घ्या नावं
Hero च्या Xtreme 125R मध्ये 125 cc इंजिन आहे, जे 11.55 PS ची पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाईकची किंमत 1,04,000 रुपये आहे.
बजाज फ्रीडम 125 ही जगातील पहिली CNG बाईक आहे. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर धावू शकते. यात 125 सीसी, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 9.3 बीएचपी पॉवर आणि 9.7 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या मते, ही बाईक CNG वर 102 किलोमीटर प्रति किलोग्राम आणि पेट्रोलवर 65 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. म्हणजेच ही बाईक एकूणच सुमारे 330 किलोमीटरची एकत्रित रेंज देईल.
Jawa 42 FJ मध्ये 334 cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 29.2 PS पॉवर आणि 29.6 Nm टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लच आहे. या बाईकची 1.85 लाख रुपये आहे.
Royal Enfield Guerrilla 450 452 cc लिक्विड-कूल्ड इंजिन वापरते, जे 40.02 PS पॉवर आणि 40 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन वेगवान आहे आणि पोस्टर ADV बाइकपेक्षा राइडिंग अधिक आकर्षक आहे. या बाईकची किंमत 2.39 लाख ते 2.54 लाख रुपये आहे.
BMW R 1300 GS मध्ये 1300 cc, लिक्विड-कूल्ड, फ्लॅट-ट्विन इंजिन आहे, जे 145 PS पॉवर आणि 149 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह जोडलेले आहे. या बाईकचा इलेक्ट्रॉनिक सूट लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तो खूपच आरामदायक आहे. याची बाईकची किंमत तब्बल 20.95 लाख रुपये आहे.