फोटो सौजन्य: Gemini
सर्वप्रथम Royal Enfield Hunter 350 बद्दल जाणून घेऊयात. ही कंपनीच्या किफायतशीर बाईक्सपैकी एक मानली जाते. कॉलेज किंवा ऑफिससाठी दररोज वापरण्यासाठी ही बाईक योग्य ठरते. विशेषतः शहरातील वाहतुकीतही ही बाईक सहजपणे नियंत्रित करता येते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.38 लाख ते 1.67 लाख रुपये आहे.
Tata Motors चा देशभरात डंका! विविध राज्यांकडून तब्बल 5000 बसेसची मिळाली ऑर्डर
दुसरी बाईक म्हणजे TVS Ronin. या बाईकमध्ये स्क्रॅम्बलर, रोडस्टर आणि क्रूझर अशा तिन्ही स्टाइलचा संगम पाहायला मिळतो. यात व्हॉइस असिस्टन्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि वेगवेगळे ABS मोड यांसारखे आधुनिक फीचर्स दिले आहेत. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 1.26 लाख ते 1.60 लाख रुपये दरम्यान आहे.
स्पोर्ट्स बाईक आवडणाऱ्यांसाठी Yamaha R15 V4 हा उत्तम पर्याय आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाइक्सपैकी ही एक मानली जाते. तिचा स्पोर्टी लुक आणि परफॉर्मन्स तरुणांना विशेष आकर्षित करतो. या बाइकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.66 लाख ते 1.74 लाख रुपये आहे.
यादीतील चौथी बाईक म्हणजे Yamaha MT-15. ही बाईक Yamaha R15 चे नेकेड व्हर्जन म्हणून ओळखली जाते. हलकी असल्यामुळे शहरात चालवताना ती खूप सोपी वाटते. तिचा स्पोर्टी आणि ॲग्रेसिव्ह लुक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या बाईकची किंमत सुमारे 1.55 लाख ते 1.74 लाख रुपये दरम्यान आहे.






