
Best Turbo Petrol SUVs in India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बाजारात टर्बो पेट्रोलमध्ये खूप पर्याय आहेत पण आम्ही तुम्हाला टॉप 3 कॉम्पॅक्ट SUV बद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या बजेटमध्ये पण बसतील आणि पॉवर पण देतील. Best Turbo Petrol SUVs in India:
या यादीतली सगळ्यात पॉवरफुल गाडी कोणती असेल तर ती महिंद्रा XUV 3XO. महिंद्राची ही छोटी SUV दिसायला तर भारी आहेच पण इंजिन एकदम राक्षस आहे. यात 1.2 लिटरचं T-GDi टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 128 bhp ची पॉवर आणि 230 Nm चा टॉर्क देतं. या सेगमेंटमध्ये एवढा टॉर्क दुसरी कोणतीच गाडी देत नाही. गाडी चालवताना एकदम स्पोर्ट्स कारसारखी वाटते. यात 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.
किंमतीबद्दल बोलायचं तर ही सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी आहे. फक्त 7.99 लाख रुपयांपासून सुरु होते. इंटिरियरमध्ये भरपूर जागा आहे, फीचर्स पण भरपूर आहेत. फक्त मागचा लूक थोडा अजून चांगला करता आला असता.
खासियत: जबरदस्त पॉवर, भरपूर स्पेस, भरपूर फीचर्स
कमतरता: मागच्या डिझाईनमध्ये काही नवीन नाही
ह्युंदाई व्हेन्यू ही तरुणांची सगळ्यात आवडती SUV आहे. तिचं डिझाईन एकदम स्टायलिश आहे आणि फीचर्स तर भरून दिले आहेत. यात 1.0 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 118 bhp पॉवर आणि 172 Nm टॉर्क देतं. हे इंजिन 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड DCT ऑटोमॅटिकमध्ये येतं. DCT म्हणजे गाडी चालवायला एकदम सोपी, गिअर बदलायचा टेंशनच नाही.
Winter Tyre Pressure: हिवाळ्यात गाडीच्या टायरमध्ये किती हवा भरावी? ‘ही’ छोटी चूक पडू शकते महागात
या गाडीची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरु होते. थोडी महाग वाटेल पण ह्युंदाईची क्वालिटी आणि सर्विस बेस्ट आहे. मागच्या सीटवर थोडी जागा कमी आहे आणि बुट स्पेस पण कमी आहे, हे दोन तोटे आहेत.
खासियत: भारी डिझाईन, भरपूर फीचर्स, स्मूथ इंजिन
कमतरता: किंमत जास्त, मागच्या सीटला कमी जागा
टाटा नेक्सॉनबद्दल वेगळं काय सांगायचं. भारतातली सगळ्यात सुरक्षित SUV म्हणून तिला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. ही पण टर्बो पेट्रोलमध्ये येते.
यात 1.2 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 118 bhp पॉवर आणि 270 Nm पर्यंतचा टॉर्क देतं. टॉर्कच्या बाबतीत ही XUV 3XO ला पण टक्कर देते. यात 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय आहेत.
किंमत 8.99 लाख रुपयांपासून सुरु होते. जागा भरपूर आहे, बिल्ड क्वालिटी एकदम मजबूत आहे. पण काही लोकांना तिचं ड्रायव्हिंग थोडं स्मूथ वाटत नाही आणि डिझाईनमध्ये गेल्या काही वर्षात फार बदल केला नाही.
खासियत: 5 स्टार सेफ्टी, पॉवरफुल इंजिन, भरपूर स्पेस
कमतरता: डिझाईनमध्ये नवीन काही नाही
याशिवाय किआ सोनेट पण आहे. तिचं इंजिन व्हेन्यूसारखंच आहे – 1.0 लिटर टर्बो जे 118 bhp देतं. किंमत 9.19 लाखापासून सुरु होते. फीचर्स खूप आहेत पण मागची सीट थोडी कमी आरामदायक आहे.
मारुती फ्रॉन्क्स पण टर्बोमध्ये येते. तिचं 1.0 लिटर बूस्टरजेट इंजिन 99 bhp देतं. किंमत फक्त 7.52 लाखापासून सुरु होते. दिसायला एकदम कूपे स्टाईल आहे पण बॉडी थोडी हलकी वाटते.
तुमचं बजेट कमी असेल आणि जास्त पॉवर हवी असेल तर XUV 3XO घ्या. आणि तुम्हाला ऑटोमॅटिक आणि स्टाईल हवी असेल तर व्हेन्यू बेस्ट आहे.