फोटो सौजन्य: Social Media
सध्या भारतात अनेक कार्स लाँच होत आहे. त्यामुळेच ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध निर्माण झाले आहे. आता तर इलेक्ट्रिक कार्स सुद्धा मोठ्या प्रमाणत लाँच होत आहे. पण एक काळ होता जेव्हा लोकांमध्ये स्वदेशी कार्सची एक वेगळीच क्रेझ होती आणि ती आजही आहे.
भारतात आजही अशा काही कार्स आहेत ज्या लक्झरी नाही आहेत पण तरी सुद्धा त्यांचे मार्केटमध्ये वजन लक्झरी कार्स पेक्षा जास्त आहे. अक्षरशः एक काळ या कार्सने गाजवला आहे. तसेच या कार्स सोबत अनेक जणांच्या काही खास आठवणी सुद्धा आहेत. चला जाणून घेऊया काही अशा कारबद्दल ज्यांनी भारतीय ऑटोमोबाईलचा एक काळ गाजवला आहे.
ॲम्बेसेडर ही भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित कार होती. भारतीय नेत्यांची आणि सरकारी अधिकाऱ्यांची कार म्हणून ती ओळखली जात होती. या कारचे 1958 ते 2014 या कालावधीत उत्पादन होत होते. या कारची मजबूत बॉडी आणि आरामदायी राइडमुळे ती लोकप्रिय कार झाली.
1970 आणि 80 च्या दशकात प्रीमियर पद्मिनी ही भारतीय मध्यमवर्गाची आवडती कार होती. स्टायलिश डिझाइन आणि कार्यक्षम कामगिरीमुळे भारतीय ही कार कधीच विसरले नाहीत. विशेषत: मुंबईच्या रस्त्यांवर ही कार जास्तकरून दिसते.
1983 मध्ये लाँच झालेल्या मारुती 800 ने भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात मोठी क्रांती घडवून आणली. तिची परवडणारी किंमत आणि इंधन कार्यक्षमता यामुळे ती मध्यमवर्गीय भारतीयांसाठी पहिली कार बनली. ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक होती.
महिंद्र जीपने भारतीय ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशात मजबूत कामगिरीसाठी विशेष ओळख निर्माण केली. लष्कर, पोलीस आणि शेतकरी यांनी या कारचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
टाटा इंडिका ही 1998 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि ती भारतातील पहिली पूर्णपणे स्वदेशी कार होती. या कारमधील विशेष इंटिरिअर आणि चांगले मायलेज यामुळे ही कार भारतीय ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहे. या कारने फक्त भारतीय रस्त्यांवरच नाही तर लोकांच्या हृदयातही आपले खास स्थान निर्माण केले आहे.