सौजन्य - नवराष्ट्र टीम
नाणेकर यांच्या निवेदनाची दखल घेत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप आणि कनिष्ठ अभियंता रोहन कापसे उपस्थित होते. बैठकीत पाणी समस्येवर चर्चा करण्यात आली आणि लवकरच तांत्रिक सल्लागारामार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पाहणीनंतर आवश्यक कामे करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पाण्याचा प्रश्न सुटल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका यांच्या विशेष निधीतून लवकरच या भागातील पाणी समस्या कायमची दूर होईल, अशी माहिती नगरसेवक सुभाष नाणेकर यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसाखाली नाणेकर यांनी नवराष्ट्रला मुलाखत दिली होती. नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. पाण्याचा प्रश्न मिटवणार असल्याचीही त्यांनी ग्वाही दिली होती. तसेच मी सरपंच असताना उत्तमनगर भागात अनेक नागरिकांच्या सोडविल्या, असंही त्यांनी सांगितलं होतं. नाणेकर हे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून भाजपचे सुभाष मुरलीधर नाणेकर विजयी झाले आहेत. विजयी झाल्यानंतर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नाणेकर प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. सुभाष नाणेकर नगरसेवक झाल्यानंतर या भागात मोठा विकास होईल, असं त्यांच्या समर्थकांकडून निवडकीआधी बोललं जात होतं. नाणेकर यांचा विजय झाल्यामुळे या भागाचा विकास होईल का, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.






