Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतःची ‘कारव्हा किंवा कॅम्परव्हॅन’ बनवायचीय? काय आहेत कायदेशीर नियम आणि अटी

भारतात गाडीच्या मूळ संरचनेत परमनंट बदल करणे बेकायदेशीर असले, तरी आरटीओच्या पूर्व-परवानगीने किंवा पोर्टेबल (काढता-घालता येणारे) फर्निचर वापरून कायदेशीररीत्या फिरते घर बनवता येते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 21, 2026 | 05:28 PM
स्वतःची ‘कारव्हा किंवा कॅम्परव्हॅन’ बनवायचीय? काय आहेत कायदेशीर नियम आणि अटी
Follow Us
Follow Us:

भारतात स्वतःची गाडी कस्टमाईज करून ‘व्हॅनलाईफ’  किंवा फिरते घर  बनवण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. परंतु, भारतीय कायद्यानुसार गाड्यांमध्ये मोठे बदल करणे हे अत्यंत कडक नियमांच्या अधीन आहे.

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ५२ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, उत्पादकाने दिलेल्या मूळ संरचनेत अनधिकृत बदल करणे बेकायदेशीर आहे. जर तुम्हाला कायदेशीररीत्या व्हॅनलाईफचा आनंद घ्यायचा असेल, तर खालील नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे,

१. काय पूर्णपणे बेकायदेशीर आहे?

स्ट्रक्चरल बदल– गाडीचे चेसिस कापणे, गाडीची लांबी किंवा रुंदी मूळ रचनेपेक्षा वाढवणे, किंवा गाडीचे छप्पर कापून टाकणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

सीट कॅपॅसिटी बदलणे: तुमच्या आरसी बुक वर जितकी आसन क्षमता (उदा. ५ किंवा ७ सीटर) लिहिलेली आहे, त्यात स्वतःहून बदल करून सीट काढून तिथे परमनंट बेड किंवा सोफा बनवणे बेकायदेशीर मानले जाते.

इंजिन आणि एक्झॉस्ट: इंजिनची क्षमता बदलणे किंवा मोठा आवाज करणारा सायलेन्सर बसवणे अवैध आहे.

भारतात EV चा वेग वाढणार? JSW Motors चा मोठा निर्णय, फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी

२. काय कायदेशीर आहे आणि कशाची परवानगी आहे?

तुम्ही गाडीच्या मूळ रचनेला धक्का न लावता अंतर्गत बदल करू शकता,

पोर्टेबल फर्निचर– गाडीमध्ये कोणताही परमनंट बदल न करता, काढता-घालता येणारा बेड, फोल्डिंग टेबल किंवा फिरते स्वयंपाकघर बनवणे पूर्णपणे कायदेशीर आहे. जोपर्यंत ते गाडीच्या आरसीमधील वैशिष्ट्यांना बदलत नाही, तोपर्यंत पोलीस किंवा आरटीओ त्यावर आक्षेप घेऊ शकत नाहीत.

कॉस्मेटिक आणि अंतर्गत सोयी– अंतर्गत इन्फोटेनमेंट सिस्टीम, अंतर्गत एलईडी लाइट्स, चार्जिंग पॉईंट्स किंवा सीट कव्हर्स बदलण्यास परवानगी आहे.

रूफ रॅक आणि कॅरिअर– सामान ठेवण्यासाठी प्रमाणित रूफ रॅक बसवण्यास परवानगी आहे, परंतु त्यावर बांधलेले सामान ठरवून दिलेल्या उंचीपेक्षा जास्त नसावे.

Driving Licence : वयाच्या 50 वर्षांपर्यंत लायसन्स होणार वैध; RTO चे टेन्शन संपले, सर्व सेवा घरबसल्या ऑनलाइन होणार

३. गाडी अधिकृतरीत्या ‘कॅम्परव्हॅन‘ म्हणून नोंदणीकृत कशी करावी?

जर तुम्हाला मोठ्या व्यावसायिक व्हॅनचे (उदा. Force Traveller, Tata Winger, किंवा एखादी मोठी बस) पूर्णपणे अधिकृत ‘कारव्हा किंवा कॅम्पर’ मध्ये रूपांतर करायचे असेल, तर ही प्रक्रिया फॉलो करावी लागेल,

ARAI ची मान्यता: ज्या गॅरेज किंवा मेकॅनिककडून तुम्ही व्हॅन कस्टमाईज करून घेणार आहात, ती डिझाईन ARAI (Automotive Research Association of India) कडून प्रमाणित असावी लागते.

आरटीओ परवानगी (RTO Approval): गाडी मॉडिफाय करण्यापूर्वी स्थानिक आरटीओकडून Form 22A द्वारे पूर्व-परवानगी घ्यावी लागते.

आरसी बुक अपडेट (RC Modification): मॉडिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर आरटीओ अधिकारी गाडीची तपासणी  करतात. मंजुरी मिळाल्यानंतर तुमच्या आरसी बुकवर वाहनाचा प्रकार बदलून ‘Campvan’ किंवा ‘Omnibus (Modified)’ अशी अधिकृत नोंद केली जाते.

जर तुम्हाला आरटीओ आणि कायदेशीर कचाट्यात पडायचे नसेल, तर “Bolt-on / Modular” पद्धत वापरा. म्हणजेच बेड, किचन काउंटर आणि साठवणुकीचे कप्पे अशा प्रकारे डिझाइन करा जे केवळ नट-बोल्टवर फिक्स असतील आणि गरज पडल्यास अवघ्या १० मिनिटांत पूर्ण गाडी पुन्हा मूळ स्थितीत आणता येईल.

 

Web Title: Carvan making in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीचे आयुष्य संपल्यावर त्याचे काय होणार? पर्यावरणपूरक विल्हेवाट कशी लावली जाणार? जाणून घ्या
1

इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीचे आयुष्य संपल्यावर त्याचे काय होणार? पर्यावरणपूरक विल्हेवाट कशी लावली जाणार? जाणून घ्या

वाहन चालवताना ‘रोड रेज’ कसा टाळावा आणि मानसिक संतुलन कसे ठेवावे? रस्त्यावरील रागाला कसा आळा घालावा? जाणून घ्या
2

वाहन चालवताना ‘रोड रेज’ कसा टाळावा आणि मानसिक संतुलन कसे ठेवावे? रस्त्यावरील रागाला कसा आळा घालावा? जाणून घ्या

तुमच्या गाडीतील ‘डॅश कॅम’ अपघात आणि कायदेशीर वादात कसा ठरू शकतो गेम चेंजर? जाणून घ्या
3

तुमच्या गाडीतील ‘डॅश कॅम’ अपघात आणि कायदेशीर वादात कसा ठरू शकतो गेम चेंजर? जाणून घ्या

भारतात गाड्यांमध्ये कोणते बदल करणे कायदेशीर आहेत आणि कोणते बेकायदेशीर आहेत? जाणून घ्या आरटीओचे नियम
4

भारतात गाड्यांमध्ये कोणते बदल करणे कायदेशीर आहेत आणि कोणते बेकायदेशीर आहेत? जाणून घ्या आरटीओचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.