मुंबई : सिट्रोन इंडिया (Citroen India) ने आपल्या बहुप्रतिक्षित नवीन सी ३ (Citroen C3) चे अनावरण केले असून, ही नवीन सी ३₹ 5,70,500 या प्रारंभिक किमतीत (एक्स शोरूम दिल्ली) उपलब्ध आहे. ९०% पेक्षा जास्त स्थानिकीकरणासह, हे मेड-इन-इंडिया मॉडेल वाहनांतील सी-क्यूबड गटातील पहिले उत्पादन आहे, जे तिरुवल्लूर, तामिळनाडू येथील उत्पादन केंद्रात तयार केले गेले आहे. देशभरातील सर्व ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूम्स द्वारे ग्राहकांना आजपासूनच नवीन सी ३ (Citroen C3) ची डिलीव्हरी मिळेल.
वाहनाचा प्रकार |
किंमत |
१.२ पी लाइव्ह | ₹ 5,70,500 |
१.२ पी फील | ₹ 6,62,500 |
१.२ पी फील व्हा इब पॅक | ₹ 6,77,500 |
१.२ पी फील ड्युअल टोन | ₹ 6,77,500 |
१.२ पी फील ड्युअल टोन व्हाइब पॅक | ₹ 6,92,500 |
१.२ पी टर्बो फील ड्युअल टोन वाइब पॅक | ₹ 8,05,500 |
नवीन सिट्रोन सी ३ (Citroen C3) आता नवी दिल्ली, गुडगाव, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, कोची, चेन्नई, चंदीगड, जयपूर, लखनौ, भुवनेश्वर, सुरत, नागपूर, वायझॅग, काॅलिकत आणि कोईम्बतूर. इत्यादी १९ शहरांमधील ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूम मध्ये किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सिट्रोन आपल्या या नवीन सी ३ (Citroen C3) च्या थेट ऑनलाईन खरेदीसाठी १०० % बाय ऑनलाईनचा विस्तार करणार आहे. ९० हून अधिक भारतीय शहरांमधील ग्राहक आणि डिलर नेटवर्कच्या बाहेरील लोक देखील आता या ऑनलाइन उपक्रमाचा भाग बनू शकतील आणि थेट कारखान्यातून सी ३ ऑर्डर करू शकतील.
ग्राहक सी ३ चे हे हाय-डेफिनिशन 3 डी कॉन्फिगरेटर ऑनलाइन किंवा ला मेसन सिट्रोनच्या फिजिटल शोरूममध्ये जाऊन अनुभवू शकतात.
एल एटेलियर सिट्रोन नामक आफ्टरसेल्स नेटवर्कद्वारे कंपनी नवीन Citroen C3 ग्राहकांना स्ट्रेस फ्री ओनरशीपचा अनुभव देईल, ज्यासाठी रिमोट डायग्नोस्टिक्स आणि १०० टक्के पार्टसची उपलब्धत्ता यांसारख्या सुविधा देण्यात येतील. सिट्रोन सर्व्हिस ऑन व्हिल्स ही सुवीधा ग्राहकांना घरपोच सेवा देऊन सामन्य प्रकारचे रिपयर्स यांसारख्या सुविधा देखील देईल. कंपनी आपल्या वचनबद्धत्तेद्वारे ग्राहकांना कम्फर्ट ॲट योर फिंगरटिप्सचा अनुभव देईल.
[read_also content=”सिट्रोनच्या नवीन सी थ्री (C3) चे अनावरण; ला मेसन सिट्रोन फिजीटल शोरूम आता मुंबईत, प्री-बुकिंग सुरू https://www.navarashtra.com/automobile/unveiling-of-citroens-new-c3-la-mason-citron-digital-showroom-now-in-mumbai-pre-booking-starts-see-the-all-details-here-nrvb-303612/”]
नवीन सी3 (Citroen C3) च्या वॉरंटी प्रोग्रामचा एक भाग म्हणून,कंपनी दोन वर्षे किंवा ४०,००० किमी (जे आधी पूर्ण होईल) साठी वाहनाची वॉरंटी देते, १२ महिने किंवा १०,००० किमी (जे आधी पुर्ण होईल) साठी स्पेअर पार्ट्स आणि ॲक्सेसरीजसाठी वॉरंटी असेल आणि अधिक कम्फर्ट आणि मोबिलिटी साठी २४/७ रोडसाइड असिस्टंन्ट असेल. संपूर्ण नेटवर्कवर ॲक्सीडेंट वॉरंटी आणि मेंटेनंस पॅकेजेस देखील उपलब्ध आहेत.
दर्जेदार अनुभवासाठी नवीन Citroen C3 ग्राहकांना सिट्रोन फ्युचर श्योर ऑफर देईल हे सर्वसमावेशक पॅकेज ग्राहकांना ……. INR 11,999* (अटी आणि नियम लागू) पासून सुरू होणार्या सुलभ मासिक पेमेंटसह सिट्रोनचा मालक बनण्याची संधी देते. पॅकेजमध्ये नियमित देखभाल, ॲक्सिडेंट वॉरंटी, रोडसाइड असिस्टंस आणि पाच वर्षांसाठी ऑन-रोड फायनेंसिंग देखील समाविष्ट आहे.
रोलँड बूचारा (स्टेलेंटिस इंडिया, सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर) म्हणाले, “भारतात नवीन सिट्रॉन सी३ लाँच करणे स्टेलेंटिस मधील आमच्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. या लॉन्च सह, सिट्रोन ने भारतातील मुख्य बी-हॅच सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की नवीन सी ३ चा कस्टमाइज्ड कम्फर्ट यूएसपी ग्राहकांसाठीक आकर्षक आणि अनोखा पर्याय बनेल. सी-क्यूबड वाहनांच्या सेक्शनमधील हे आमचे पहिले मॉडेल आहे, जे भारतीयांसाठीच भारतात डिझाइन केले गेले आहे. नवीन सी ३ मध्ये ९०% पेक्षा जास्त स्थानिक पार्ट सह, चेन्नईतील मजबूत सप्लायर बेस, आर ॲंण्ड डी सेंटर, तिरुवल्लूर येथील व्हेईकल असेंबली प्लांट आणि तामिळनाडू राज्यातील होसूर येथील पॉवरट्रेन प्लांटचा फायदा होत आहे.”
सौरभ वत्स, ब्रँड हेड, सिट्रोन इंडिया म्हणाले, “आम्ही आमच्या यशस्वी युवा ग्राहकांसाठी नवीन सी३ लाँच करताना खूप उत्सुक आहोत, या सी३ मध्ये एसयुव्ही-स्टाईलसह लाइव्ह एलिव्हेटेडचा सिट्रोनचा चौपट ॲडव्हान्स कम्फर्ट असेल. फ्लाइंग कार्पेट इफेक्टने युक्त ड्रायव्हिंग कम्फर्ट स्पेस, सानुकुलित एअर कंडिशनिंग , वायरलेस एन्ड्रॉईड ऑटो ॲण्ड ॲप्पल कार प्ले , मिरर स्क्रिन टेक्नॉलजी , कस्टमाईड कम्फर्ट, बाहेरील १० कलर कॉम्बीनेशन्स , ३५ पॅक्स , ५६ कस्टमायझेशन ऑप्शन आणि ७० हून अधिक ॲक्सेसरीज ह्या लॉन्चवेळी उपलब्ध असतील,याची आणखी काही वैशिष्ट्य म्हणजे अवॉर्ड विनिंग फ्यूल एफिशियंन्स पॉवरट्रेन , १.२ एनए प्युरटेक ८२ आणि ५ स्पीड एमटी आणि १.२ टर्बो प्युरटेक ११० सह ६ स्पीड एमटी ,ही नवीन सी ३ उमद्या तरूण ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने नवीन स्टाइल आयकॉन असेल. ज्याला #एक्सप्रेज यूअर स्टाईल असे म्हणता येईल.
ग्राहक आता आपल्या जवळच्या ला मेसन सिट्रॉन फिजिकल शोरूमला भेट देऊन टेस्ट-ड्राइव्ह घेऊ शकतात आणि नवीन सिट्रोन सी ३ च्या कस्टमाइज्ड कम्फर्टची टेस्ट ड्राइव घेऊ शकतात. www.citroen.in या वेबसाईटवर ऑनलाइन कार बुकिंग करता येईल.
१. नवीन सी ३ ची सुरूवातीची किंमत आहे ₹ 5,70,500 (एक्स शोरूम दिल्ली ).
२. भारतीयांनी भारतीयांसाठी निर्माण केलेल्या या नव्या सी ३ मुळे ९० टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिकीकरण .
३. दोन इंजिनांचे पर्याय, १.२ एल प्योरटेक ११० आणि १.२ एल प्योरटेक ८२.
४. १० एक्सटीरियर कलर कॉम्बिनेशंस मध्ये उपलब्ध, ५६ कस्टमाइज़ेशन ऑप्शन्स बरोबरच 3 पॅक्स.
५. २ वर्ष किंवा ४०,००० किमी आणि २४/७ रोडसाइड असिस्टेंससाठी वाहनची वॉरंटी
६. १९ शहरांमधील २० ला मेसन सिट्रोन फिजिटल शोरूम्स द्वारा विक्री .
७. ९० हून अधिक शहरांमध्ये डोरस्टेप डिलीवर मिळेल, याचबरोबरच ग्राहक थेट फॅक्ट्रीमधुन देखील नवीन सी ३ खरेदी करू शकतात.