संग्रहित फोटो
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमा शेत परिसरात राहणारा अमोल कापरे याने त्याच्या शेतात जनावरांसाठी घास लावलेला आहे, अमोल हे शेतात काम करत असताना शेतात आलेल्या दत्तात्रय कापरे याने शेतातील घास कापला, त्यामुळे कोणालाही न विचारता घास का कापला असे अमोल याने विचारले असता दत्तात्रय याने हातात कोयता घेऊन अमोलचा पाठलाग करत मी तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. अमोल हा जीव वाचवण्याच्या प्रयत्नाने पळत जाऊन दुचाकीवर बसून घरी जात असताना पुढे दत्तात्र्यची पत्नी सारिका कापरे व मुलगा ओम कापरे हे दोघे आले. ओम याने अमोलला गाठून अमोल कापरेशी दमदाटी केली. दत्तात्रय कापरे याने त्याच्या हातातील कोयत्याने अमोलच्या डोक्यावर वार करत गंभीर जखमी करुन तिघेही पळून गेले. यावेळी अमोल कापरे याच्या कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
सदर घटनेत अमोल प्रभाकर कापरे गंभीर जखमी झाला असून, याबाबत अमोल प्रभाकर कापरे वय (३१ वर्षे रा. भीमाशेत तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्तात्रय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे व ओम दत्तात्रय कापरे तिघे (रा. भीमाशेत तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.
हे सुद्धा वाचा : शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…






