Darjeeling landslide (Photo Credit - X)
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग परिसरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि भूस्खलनामुळे मोठी वाताहत झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यासोबतच, भूतानमधून वाहत येणाऱ्या वांगचू नदीचा जलस्तर धोकादायक पातळीवर वाढल्यामुळे उत्तर बंगालमधील जिल्ह्यांवर महापुराचे संकट उभे राहिले आहे.
भूस्खलनामुळे दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात मोठी हानी झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागांतील जलस्तर वेगाने वाढत आहे, त्यामुळे सखल भागांतील स्थिती गंभीर बनली आहे.
Deeply pained by the loss of lives due to a bridge mishap in Darjeeling. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon. The situation in Darjeeling and surrounding areas is being closely monitored in the wake of heavy rains and landslides. We… — Narendra Modi (@narendramodi) October 5, 2025
India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन
दार्जिलिंगमध्ये संकट सुरू असतानाच, भूतानच्या अधिकाऱ्यांनी वांगचू नदीच्या (जी भारतात रैदक म्हणून ओळखली जाते) वाढत्या जलस्तराबाबत पश्चिम बंगाल सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
दार्जिलिंगमधील या नैसर्गिक आपत्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून लिहिले की, “दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शोक व्यक्त करत लिहिले की, “पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे झालेली जीवितहानी दुखद आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करते आणि बचाव व मदत कार्याला यश मिळो, तसेच जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.”